उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर एका आरोपीस अटक 

श्री तुळजाभवानी बोगस वेबसाइट प्रकरण 

 
d

उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर  श्री तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भक्तांना लुटण्याचा गोरखधंदा करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी आज अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीस तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भक्तांना लुटण्याचा गोरखधंदा काही पुजाऱ्यांनी सुरु केला होता. कोरोना काळात मंदिर बंद असताना पूजा विधीच्या नावाखाली लूट करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड उस्मानाबाद लाइव्हने माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून केला होता. 

त्यानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या नावे बोगस वेबसाइट काढून भाविकांची फसवणूक करणाऱ्या  https://www.tuljabhavani.in/ या वेबसाइटसह २ https://tuljabhavanipujari.com / ३  https://www.tuljabhavanimandir.org/ ४. https://shrituljabhavani.com/ ५. https://epuja.co.in/ या पाच वेबसाईटवर भादंवि ४२०, ६६ c , ६६ d नुसार तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये २३ ऑक्टोबर रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. 

गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी पोलिसांनी एकाही आरोपीस अटक केली नव्हती,. https://www.tuljabhavani.in या वेबसाइटचा  चालक आणि वेब डेव्हल्परचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊनही पोलीस आरोपीस अटक करीत नव्हते. हे विशेष.  तेव्हा उस्मानाबाद लाइव्हने बातमी देताच पोलीस ताळ्यावर आले आहेत आणि एका आरोपीस अटक केली आहे. 


केदार दीपक लसणे रा. तुळजापूर असे या आरोपीचे नाव आहे,  या आरोपीस तीन दिवसाची म्हणजे १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे आता अन्य आरोपीस  पोलीस केव्हा अटक करणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 


 

From around the web