नितिन राऊत यांनी ऊर्जामंत्री पदाचा राजीनामा देऊन महावितरण मध्ये क्लर्क म्हणून काम करावे 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा टोला 
 
नितिन राऊत यांनी ऊर्जामंत्री पदाचा राजीनामा देऊन महावितरण मध्ये क्लर्क म्हणून काम करावे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उस्मानाबाद दौऱ्यावर आले असून पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला...

उस्मानाबाद - ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देवून  महावितरणच्या कार्यालयात क्लर्क म्हणून काम करावे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मारला आहे. 

भारतीय जनता पार्टीने बिले आणून द्यावेत मग मी तपासतो असे नितीन राऊत यांनी म्हटले असून, मंत्र्यांचे काम बिले तपासणे आहे का ? असा प्रतिप्रश्न करीत दरेकर यांनी राऊत यांनी शंभर युनिट मोफत वीज आणि वीज बिलात सवलत हा शब्द पाळला नसून, यामुळे जनतेत उद्रेक असल्याचे सांगितले. 

 वीज कंपनीवर ऊर्जामंत्र्यांचा विश्वास आहे, परंतु ग्राहकांवर नाही. राज्यातील जनतेवर अविश्वास दाखवणे निंदनीय आहे. राज्य सरकारने १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनावरून यु टर्न मारला आहे. उलट ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम उर्जामंत्र्यांनी केले आहे. वीज बिलात सवलत नाही, मदत नाही. वीज बिले जबरदस्तीने वसुल करण्याची ही ठाकरे सरकारची जुलमी राजवट असल्याची जोरदार टिका  प्रविण दरेकर यांनी आज केली. 

आपण कोण आहोत, आपले अधिकार काय आहेत, याचे भान नितीन राऊत यांना नाही. काँग्रेसच्या मंडळींना मुख्यमंत्री आणि शिवसेना विचारत नसल्याचा टोलाही दरेकर यांनी यावेळी मारला. 

पाहा  काय म्हणाले दरेकर 

From around the web