गांजा तस्करीतील आरोपी मीना पाटील साडेतीन महिने झाले तरी फरार

 


पोलीस आरोपी महिलेस अटक करीत नसल्याने उलट - सुलट चर्चा 

 गांजा तस्करीतील आरोपी मीना पाटील साडेतीन महिने झाले तरी फरार


उस्मानाबाद -  नळदुर्ग पोलीस  स्टेशन हद्दीतील अणदूर शिवारात  मध्ये १७ जून रोजी ९७ किलो गांजा पकडण्यात आला होता. या प्रकरणातील  मुख्य आरोपी मीना पाटील हिला  पोलीस अटक  करीत  नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याने पोलीस आरोपीस अभय देत असल्याची चर्चा सुरु आहे.तुळजापूर तालुक्यातील  अणदूर गावाजवळ सोलापूरकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक MH 25 AL 9199 इनोव्हा गाडीमध्ये पोलिसांनी ९७ किलो गांजा जप्त करीत आरोपी बाळासाहेब परबत ( रा तडवळे ता माढा) व सोमनाथ कदम ( रा कदम वस्ती ता मोहोळ) यांना अटक केली होती.  ९७ किलो गांजाच्या १९ लाख ५९ हजार २०० रुपयांच्या किमतीसह गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण ३४ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नळदुर्ग पोलीस ठाणे  येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला  असून या गुन्ह्यातील जप्त गाडी ही मीना पाटील यांची असल्याचे समोर आले होते. 


तुळजापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक  गणेश झिंजुर्डे यांची वाशी पोलीस स्टेशनला बदली झाली असताना, त्यांनी ही  कामगिरी केली होती. या प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक  गणेश झिंजुर्डे  यांना  निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणात नळदुर्ग सपोनिवर संशयाची सुई दिसल्यानंतर त्याचा तपास तुळजापूरच्या एका पोलीस निरीक्षकाकडे देण्यात आला आहे. 


आरोपी मीना पाटील हिने उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात  अटकपूर्व जामीन  मिळावा, यासाठी अर्ज दाखल होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळला आहे.तरीही पोलीस या महिला आरोपीस अटक करीत नाहीत. पोलीस आरोपीस अभय देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाटील बाई भारत सोडून परदेशात  गेली का ? असा संतप्त सवाल केला जात आहे. 


पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील गोकूळ कलेक्शनमध्ये २०१८ साली उस्मानाबाद जिल्ह्याची रहिवासी असलेली मनसेची माजी  महिला प्रदेश सचिव मीना पाटील हिला तिच्या २ मुलींसह ३० हजार रुपयांच्या साड्या चोरताना रंगेहात पकडण्यात आले होते.चोरीच्या साडीवर दिवाळी सण साजरा करण्यासाठी केलेल्या या साडीचोरीचा व्हिडिओ महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला होता.साडी चोरी नंतर गांजा तस्करीत अडकलेल्या मीना पाटील हीचा नवा कारनामा उघडकीस आला होता. 


From around the web