बोगस कचरा डेपो प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर गुन्हा दाखल होणार ?

दोन तत्कालीन मुख्याधिकारीही जबाबदार 
 
c
आ. सुरेश धस यांनी प्रकरण धसास लावले 

धाराशिव - धाराशिव शहरातील बोगस  कचरा डेपो प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तत्कालीन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर , मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

धाराशिव शहरातील बोगस  कचरा डेपो प्रकरणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न  उपस्थित केला होता. त्यात म्हटले आहे की, ३ ते ५ लाखाच्या कामासाठी २ कोटी २२ लाख रुपये अदा  करण्यात आले. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट केले नाही. सर्व्हे नंबर ३४८ मध्ये हा कचरा डेपो दाखवला होता पण तेथे कोणतेही मशिनरी नव्हती. त्या प्लॉटमध्ये कचरा देखील नव्हता, बोगस कचरा डेपो दाखवून २ कोटी पेक्षा अधिक रक्कमेचा अपहार करण्यात आला. त्यास तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तकालीन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे जबाबदार आहेत. 

त्यावर उत्तर देताना, मंत्री उदय सामंत यांनी, कचरा डेपो प्रकरणी  गैरव्यवहार झाल्याचे मान्य  करून, त्याचे नामांकित संस्थेकडून ऑडिट केले जाईल तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले. 

त्यामुळे या प्रकरणात  मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तकालीन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.


या कचरा डेपोचे टेंडर पर जिल्ह्यातील एका कंपनीला देण्यात आले होते. त्यात एका बड्या राजकीय नेत्याची पार्टनरशिप होती. सत्ता जाताच, सर्व भानगडी उघडकीस येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

s


 

From around the web