उस्मानाबाद : शेतकरी विधेयकाबाबत रावसाहेब दानवे यांचा विरोधकांबद्दल गंभीर आरोप आरोप

 
उस्मानाबाद :   शेतकरी  विधेयकाबाबत रावसाहेब दानवे यांचा विरोधकांबद्दल गंभीर आरोप आरोप


उस्मानाबाद - शेतकर्‍यांचा सन्मान व बळ वाढवणारे कृषी विधेयक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केले असून कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जाऊन याबाबत जनजागृती करावी असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री  रावसाहेब दानवे पाटील यांनी येथे केले.


      उस्मानाबाद  जिल्हा पदाधिकार्‍यांच्या प्रथमच आयोजित केलेल्या बैठकीस ते मार्गदर्शन करत होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, खा. डॉ. भागवत कराड, जिल्हा प्रभारी रमेश पोकळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्र. का. स. अॅड. मिलिंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


      जिल्हा पदाधिकारी निवडीनंतर प्रथमच जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी करून पक्षस्थिती आढावा समोर ठेवला. त्यानंतर दानवे पाटील म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशात एकामागून एक लोककल्याणकारी निर्णय करत असून नुकतेच शेतकर्‍यांना उभे करणारे कृषी विधेयक मंजूर केल्याने विरोधक निव्वळ विरोध करीत सुटले आहेत. हा अपप्रचार असून कृषी विधेयक हे शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असल्याने कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जाऊन जनजागृती करावी. व येणार्‍या पदवीधर निवडणुकीत भाजपा उमेदवार निवडून येईल यासाठीही कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही शेवटी संगितले.


      कोरोना काळात जिल्ह्यात पक्षाकडून मोठे कार्य केलेल्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अॅड. नितीन भोसले यांनी केले. या बैठकीस अॅड. व्यंकटराव गुंड, . अनिल काळे,. सतीश दंडनाईक , . अविनाश कोळी, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, पं. स. सभापती दिग्विजय शिंदे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा सरचिटणीस आदम शेख, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी गरड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर तसेच सर्व तालुकाध्यक्ष, विविध आघाडी व मोर्चाचे प्रमुख उपस्थित होते.

From around the web