दिल्लीतील निजामुद्दीन धार्मिक कार्यक्रमाचे उस्मानाबाद कनेक्शन

 
आठ लोकांचा जिल्हा प्रशासन घेत आहे शोध 

दिल्लीतील निजामुद्दीन धार्मिक कार्यक्रमाचे उस्मानाबाद कनेक्शन


उस्मानाबाद : दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या  तब्लिग-ए-जमात या धार्मिक कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ जण सहभागी झाल्याचे उघड झाले असून, त्यांच्या संपर्कात किती  जण आले आहेत. अश्या  नागरिकांचा तपास  जिल्हा प्रशासनाने सुरू केला  आहे.


कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी देश -विदेशातून 2137 जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. 

या धार्मिक स्थळी उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ  गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. पैकी एक जण मयत झाला आहे. चार  जण दिल्लीत अडकले असून तिघे जण उस्मानाबादेत परतले होते.  3 पैकी उस्मानाबाद शहरातील दोन आणि परंडा शहरांतून एकजण गेला होता, त्यांच्या संपर्कात कितीजण आले हे अजून स्पष्ट झालेले नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात परतलेल्या त्या तीन  व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. या तीन लोकांमुळे  जिल्ह्यातही कोरोणाचे लोन पसरण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून अशा नागरिकांची शोध मोहिम गल्ली, गावात सुरू झाली आहे.

हे सर्व नागरिक विविध तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित गावात जावून प्रशासन ‘त्या‘ नागरिकांचा शोध घेत आहे. त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांची ही तपासणी केली जाणार आहे. सर्दी, खोकला, ताप अशी काही लक्षणे आढळली तर त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील.  शिवाय दिल्लीहून आलेल्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांची तपासणी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यासाठी कसून तपासणी सुरु केली आहे.


प्रशासनाचा सतर्कतेचा आदेश 

जिल्ह्यातील काही नागरिकांचा संपर्क दिल्लीतील नागरिकांशी झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने यावर प्रभावी उपायोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्या भागात हे नागरिक आले आहेत. त्या भागातील नागरिकांना घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई केली आहे. शिवाय जिल्ह्यातही नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


सर्व तहसीलदारांना याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. ‘त्या‘ आठ नागरिकांचा शोध प्रशासन घेत आहे. त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांना क्वारंटाईन कक्षात ठेवले जाईल.
- राजेंद्र खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद 


हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित

हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी 2137 जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. यापैकी 1203 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 राज्यात 800 लोकांचा शोध सुरु आता सुरु आहे. यांच्या संपर्कातल्या आलेल्यांचे आकडे हजारात असू शकतात. जानेवारीपासून 2 हजार विदेशी तब्लिगी भारतात दाखल झाले होते, अशी देखील माहिती आहे.

मरकज म्हणजे काय?
दिल्लीतील निजामुद्दीन इथे जे मरकज (उर्दू शब्द) आहे, त्याला तब्लिग जमातीचे संस्थान असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिग जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मरकज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठे-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लीम तब्लिगी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळे प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. (जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्याइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते)


दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तब्लिगी जमातच्या इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनला.

From around the web