तुळजापूर वन विभागात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामांत भ्रष्टाचार
धाराशिव - तुळजापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी बी.ए. चौगुले आणि धाराशिवच्या सहाय्यक वनसंरक्षक ( रोहयो व कॅम्पा ) यांनी संगनमत करून रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या भ्रष्ट कारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी प्रस्तावित करून चौकशीअंती संबंधित सर्व दोषीविरुद्ध कठोर कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे दि. १२ मे रोजी केली होती.
या तक्रारीची जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी गंभीर दखल घेऊन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांची समिती नियुक्त केली असून, १५ दिवसांत तक्रारीची परिपूर्ण चौकशी करून, स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे तक्रार ?
१. मजुरांना आठवड्यातून एक दिवस आरामाकरिता किंवा बाजार हट्टा करिता सुट्टी देणे अभिप्रेत आहे. परंतु प्रत्यक्षात काही ठराविक मजुरांना साप्ताहिक सुट्टी दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे बी. ए. चौगुले वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद व वृक्षाली तांबे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व कॅम्पा), उस्मानाबाद मु. लातूर यांनी मजूर कायद्यातील तरतुदीचे उल्लघंन केले आहे.
२. शासन तरतुदीनुसार काम मागणी केलेल्या मजुरांना आलटरनेट पद्धतीने प्रत्यक्षात काम उपलब्ध करुन न देता काही ठराविक मजुरांनाच हेतुपुरस्सर बी. ए. चौगुले वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद व वृक्षाली तांबे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व कॅम्पा), उस्मानाबाद मु. लातूर यांनी काम उपलब्ध करुन दिल्याचे दिसून येते.
३. मजुरांना हत्यार पाझरणे या करिताचे बी. ए. चौगुले वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद व वृक्षाली तांबे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व कॅम्पा), उस्मानाबाद मु. लातूर यांनी देयक दिल्याचे संकेतस्थळावरती दिसून येत नाही.
४. हजेरी मस्टर वरती मजूर कामावर असलेली उपस्थिती ग्राम रोजगार सेवक यांनी घेतलेली नाही. त्यामुळे हजेरी मस्टर वरती ग्राम रोजगार सेवक यांची स्वाक्षरी नाही.
५. बी. ए. चौगुले वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद व वृक्षाली तांबे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व कॅम्पा), उस्मानाबाद मु. लातूर यांनी सर्व हजेरी मस्टर वरील पेमेंट एकाच बैंक शाखेत सोडल्याचे दिसून येते. नरेगा अंतर्गत ए.बी.पी.एस. प्रणाली असून एकाच बैंक शाखेत मजुरी जमा होणे हे संश्यास्पद आहे. तसेच काही मजुराची मजुरी पोस्ट खात्यात जमा झाल्याचे दिसते परंतु नरेगा अंतर्गत मार्गदर्शक सुचणे प्रमाणे सर्व देयके राष्ट्रीयकृत बैंक खात्यात जमा होणे अपेक्षीत आहे.
६. वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद यांनी वृक्ष लागवड केलेल्या रोपांच्या संख्येपैकी ८०% हेवढी जिवंत रोपांची संख्या असली पाहिजे परंतु माझे असे निदर्शनास आले आहे की, वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद यांनी वृक्ष लागवड केलेल्या रोपांच्या संख्येपैकी ५०% हेवढी देखील जिवंत रोपांची संख्या नाही. त्यामुळे शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात बी. ए. चौगुले वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद व वृक्षाली तांबे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व कॅम्पा), उस्मानाबाद मु. लातूर यांनी अपव्य केलेला आहे.
७. सार्वजनिक कामावरती एन.एम.एम.एस. प्रणाली द्वारे हजेरी घेणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने संबंधीत ग्राम पंचायतीच्या ग्राम रोजगार सेवक यांना स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. परंतु त्या लॉगीनचा वापर न करता बी. ए. चौगुले वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद यांनी वृक्षाली तांबे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व कॅम्पा), उस्मानाबाद मु. लातूर यांचे संगनमताने, शासनाची दिशाभूल करुन स्वतंत्र युजर आयडी तयार करुन, फेक उपस्थिती नोंदवून, बोगस देयके अदा करुन, शासकीय निधीचा अपहार केला आहे.