उत्तर भारतातून दक्षिणेकडे प्रवास करणारे १२ मुस्लिम यात्रेकरूचे उस्मानाबाद कनेक्शन

 
उत्तर भारतातून दक्षिणेकडे  प्रवास करणारे १२ मुस्लिम  यात्रेकरूचे उस्मानाबाद कनेक्शन


उस्मानाबाद - उत्तर भारतातून दक्षिणेकडे  प्रवास करणारे १२ मुस्लिम  यात्रेकरू  उस्मानाबाद बायपास जवळील एका धाब्यावर उतरल्याचे समोर आले असून, या यात्रेकरुंच्या संपर्कात आलेले  जवळपास सात -आठ जणांनी तपासणीसाठी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे.


धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले 12 यात्रेकरू दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या 12 जणांचे स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. या कोवीड 19 पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे यात्रेकरू लातूरकडे जात असताना, उस्मानाबादच्या एका धाब्यावर उतरले होते, त्यावेळी उस्मानाबाद शहरातील काही मुस्लिम नेते त्यांची जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी गेले होते. बरेचजण लांबच थांबले होते, पण काहींनी सेवा केली होती.


या यात्रेकरुना कोरोना झाल्याचे समोर येताच उस्मानाबादच्या मुस्लिम नेत्यात खळबळ उडाली असून त्यांनी स्वतःला अलग करून घेतले आहे, तसेच तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे.

संबंधित यात्रेकरू उस्मानाबादला ज्या ठिकाणी उतरले होते, तो परिसर सील  करण्याचे काम सुरु आहे, तसेच या यात्रेकरूंच्या संपर्कात कोण- कोण आले याची माहिती घेणे सुरु आहे.


  • मिळालेल्या माहितीनुसार, हे १२ यात्रेकरू उस्मानाबादला १ एप्रिल रोजी आले होते, त्यांनी पाहुणचार घेतला तसेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी तुळजापूर, नळदुर्ग, येणेगुर येथे थांबून निलंगा येथे गेल्याचे समोर आले आहे. या १२ यात्रेकरूंच्या संपर्कात नेमके किती जण आले, याचा शोध प्रशासन घेत आहे. 


  • उस्मानाबादच्या  ढाब्यावाल्याने नियम धाब्यावर बसवल्याने नेमका कुणाचा दोष, याचा तपास करण्याची गरज आहे. 

From around the web