मुस्लिम यात्रेकरूचे उस्मानाबाद कनेक्शन : 10 नागरिक होम क्वॉरंटाईन

 
 मुस्लिम यात्रेकरूचे उस्मानाबाद कनेक्शन :  10 नागरिक होम क्वॉरंटाईन


उस्मानाबाद -  निलंगा येथे आढळून आलेल्या आठ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या उस्मानाबाद येथील दहा जणांना अखेर  होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. उत्तर भारतातून दक्षिणेकडे  प्रवास करणारे १२ मुस्लिम  यात्रेकरू  उस्मानाबाद बायपास जवळील एका धाब्यावर उतरल्याचे समोर आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या १० मुस्लिम नागरिकांची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

यापूर्वीचे सविस्तर वृत्त वाचा 

उत्तर भारतातून दक्षिणेकडे प्रवास करणारे १२ मुस्लिम यात्रेकरूचे उस्मानाबाद कनेक्शन

धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले 12 यात्रेकरू दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या 12 जणांचे स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली.

 हे बारा यात्रेकरू निलंगा  जात असताना १ एप्रिल ( बुधवारी ) रोजी  रात्रभर औरंगाबाद बाह्यवळण रस्त्यावरील मेवाड काझी ढाब्यावर मुक्कामास असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या भोजनाची व अन्य आवश्यक सोय करण्यासाठी उस्मानाबाद शहरातील काहीजण थांबले होते.

त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास १० जणांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणी करण्यात आल्यानंतर कोरोनासदृष्य लक्षणे सध्या तरी आढळलेले नाहीत. लक्षणे दिसून येण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी लागतो. यामुळे सर्व दहाजणांना होम क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने या सर्वांची माहिती संकलित केली असून त्यांच्यावर आगामी 14 दिवस नजर ठेवण्यात येणार आहे, दरम्यान, यात्रेकरू  मुक्कामास असलेला ढाबा पूर्णपणे सॅनेटाईज करण्यात आला आहे.


कोरोनाग्रस्त  यात्रेकरू  हरियानातून निघाले होते. धार्मिक प्रचार करत ते उस्मानाबादला पोहोचले. येथे पाहूनचार घेऊन तुळजापूर, नळदुर्ग, दाळींब, येणेगूर, सास्तुर येथे भेट घेत त्यांनी लातूर जिल्ह्यात प्रवेश केला असल्याचे समजते. ते उस्मानाबादला आल्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवून ढाबा सुरु करण्यात आला होता आणि सर्व शासकीय यंत्रणा झोपा काढत होती, असे समोर आले आहे. 

From around the web