कोरोनाची धास्ती , त्यात जिल्हा रुग्णालयाची मस्ती !

 
कोरोनाची धास्ती , त्यात जिल्हा रुग्णालयाची मस्ती  !

उस्मानाबादच्या लोकांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. कुणाला साधा ताप, सर्दी , खोकला आला तरी लोक रुग्णालयाकडे धाव घेत आहेत, त्यामुळेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णाची गर्दी होत आहे. 

लोक एकीकडे कोरोनामुळे भयभीत झाले असताना, जिल्हा शासकीय  रुग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे बेफिकीर दिसत आहेत. ओपीडीमध्ये  आपापल्या जागेवर न बसता आपल्या खासगी रुग्णालायत बसून रुग्णाची लूट करीत आहेत. शिकाऊ डॉक्टर वेळ मारून नेत  आहेत, 

गंभीर बाब म्हणजे उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात  खोकल्यावर उपायकारक असलेले  कफ सिरप औषध उपलब्ध नाही.रुग्णांना बाहेरच्या मेडिकलमध्ये ते विकत घ्यावे लागत आहे. 

उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला  शासन मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करीत असताना, शासनाचा पैसा नेमका जातो कुठे ? जिल्हा शल्य चिकित्सक विविध खरेदीमध्ये मलाई खात असल्याची चर्चा आहे. 

कोरोनाची धास्ती , त्यात जिल्हा रुग्णालयाची मस्ती  !

From around the web