कोरोना : उस्मानाबाद जिल्हा ऑरेंज झोन मध्ये

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्हा ऑरेंज झोन मध्ये


उस्मानाबाद - कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन,15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट होतील.उस्मानाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल पर्यंत तीन कोरोना बाधित रुग्ण असल्याने हा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये येणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला  २१ दिवसाचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता, पण कोरोनाचा कहर पाहता तो ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असताना राज्यात तीन झोन पाडण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडिओ संवाद साधला. याच संवादात केंद्र सरकारने 15 आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन म्हणून जाहीर करावे, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला ऑरेंज झोन म्हणून तर एकही रुग्ण नसेल अशा भागाला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती, या मागणीला तत्वतः मान्यता मिळाल्याचे कळते.

 कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. म्हणजे या दोन झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल पर्यंत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात उमरगा तालुक्यातील दोन आणि लोहारा तालुक्यातील एक अश्या तिघांचा समावेश आहे. उमरगा तालुक्यातील दोन्ही रुग्णाचा दिल्लीशी  संबंध आहे तर लोहारा तालुक्यातील रुग्ण मुंबईहुन आला होता. हे दोन्ही तालुके वगळता अन्य तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही, त्यामुळे हे दोन्ही तालुके वगळता अन्य तालुक्यात काही अटी शिथिल होऊ शकतात आणि व्यवहार पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये ... 

रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद

ऑरेंज झोन : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदिया

ग्रीन झोन : धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली

From around the web