नराधम शिक्षक मोहन सुरवसे याचे अन्य विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

 
नराधम शिक्षक मोहन सुरवसे याचे अन्य विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
उस्मानाबाद – सहावीत शिकणाऱ्या एका १२ वर्षाच्या विद्यार्थीनीशी अश्लील चाळे  करून गैरवर्तन करणाऱ्या  नराधम शिक्षकाविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केले होते, परंतु त्याने आजाराचे सोंग घेतल्याने त्यास उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी आज  न्यायालयात हजर केले नाही. दरम्यान पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबामध्ये सदर नराधम शिक्षक आणखी काही विद्यार्थीनीबरोबर असेच अश्लील चाळे करत होता, असा जबाब दिल्याने पालकवर्गात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील एका नामांकित विद्यालयात  मोहन सुरवसे नावाचा नराधम शिक्षक सहावीत शिकणाऱ्या एका १२ वर्षाच्या विद्यार्थीनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले होते. त्यानंतर एका संतप्त  जमावाने त्यास बेदम चोप देत उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर केले होते. त्यानंतर पीडित मुलीचा जबाबावरून सुरवसे याच्याविरुद्ध भादंवि ३५४, ३५४ -A, तसेच पोस्कोचे  कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास अटक करण्यात आले, मात्र लोकांनी आपणास बेदम मारहाण केली असून, त्यामुळे पोटात दुखत असल्याची तक्रार सुरवसे याने केली, त्यानंतर त्यास उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी आज त्यास न्यायालयात हजर केले नाही.

दरम्यान, पीडित विद्यार्थीनीने दिलेल्या जबाबात मोहन सुरवसे हा अन्य काही  विद्यार्थीनीबरोबर  अश्लील चाळे करत होता, असा जबाब दिला आहे मांडीवर बसवणे, छातीवरून हात फिरवणे, अश्लील बोलणे असे तो गैरवर्तन करत होता, असा जबाब दिला आहे. त्यामुळे अन्य विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक समोर येणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

मोहन सुरवसे हा विक्षिप्त स्वभावाचा असून, तो मागे एका स्कुल बस चालकांकडून लाच घेताना एसीबीचाय जाळ्यात अडकला होता. त्यानंतर त्यास संस्थेने निलंबित केले होते, मात्र नंतर त्यास जॉईन करून घेतल्यानंतर हा नवा प्रताप केला आहे. विशेष म्हणजे या नराधम शिक्षाकाची पत्नी याच शाळेत शिक्षिका म्हणून काम करते, त्यामुळे खाली मान घालण्याची वेळ तिच्यावर आली आहे

संस्थेचे नाव खराब
नराधम शिक्षक ज्या शाळेत शिकवतो, ती शाळा उस्मानाबादच्या जुन्या नावाशी निगडित आहे. सदर शाळा काही दिवंगत स्वातंत्र्यसैनिकानी स्थापन केलेली असून, मोहन सुरवसे याच्या प्रतापामुळे शाळेचे नाव बदनाम झाले आहे. 

From around the web