कोरोनाचा संशयित रुग्ण उस्मानाबादेत दाखल ...

 
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वार्ड बंद 

उस्मानाबाद - पिंपरी चिंचवडहून आलेला उस्मानाबाद तालुक्यातील सम्रुद्रवाणी गावातील कोरोनाचा एक संशयित रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात आल्यानंतर कोरोनाचा वार्डच बंद असल्याने हा रुग्ण गेल्या एक तासापासून  रुग्णालयाच्या कोरोना वार्डच्या गेटसमोर ताटकळत उभा आहे.

कोरोनाचा  संशयित रुग्ण उस्मानाबादेत दाखल ...
कोरोना  व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी उस्मानाबादची आरोग्य यंत्रणा सज्ज  असल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी  वारंवार पत्रकार परिषदेत केला होता, परंतु उस्मानाबाद  जिल्हा  शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेला वार्डच  बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा दावा फोल निघाला आहे.


उस्मानाबाद तालुक्यातील सम्रुद्रवाणी गावातील ५५ ते ६० वयाचा एक व्यक्ती पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे गेला होता, परत आल्यानंतर त्याला ताप आणि घश्याचा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर तो सम्रुद्रवाणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास कोरोनाचा संशयित  रुग्ण म्हणून उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे रुग्णवाहिकने पाठवले. त्यानंतर सदर संशयित रुग्ण कोरोना वार्ड मध्ये गेल्यानंतर हा वार्ड बंद दिसला. त्यामुळे तो रुग्ण गेल्या एक तासापासून कोरोना वार्डच्या गेटसमोर ताटकळत उभा आहे.

उस्मानाबादचे सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी, यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक गलांडे यांना फोन केला असता, त्यांनी फोनच उचलला नाही. विशेष म्हणजे आजच पालकमंत्री शंकरराव गडाख उस्मानाबादेत आले असून त्यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधाबाबत पत्रकारांना माहिती देत आहे. पत्रकार परिषेदच्या अगोदरच हा दावा फोल ठरला आहे. 

From around the web