उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यास नोटीस
Mar 21, 2020, 19:20 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर समुद्रवाणी आणि उस्मानाबादच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार की फक्त चौकशीचा फार्स होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने एकीकडे कंबर कसली असताना जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बेफिकीर आणि निष्काळजीवृत्ती १७ मार्च रोजी दिसून आली होती.
समुद्रवणीच्या एका वृद्ध व्यक्तीस स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याने कोरोना संशयित म्हणून अब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाठवले पण तो येथे आल्यानंतर कोरोना वार्डच बंद होता. तो एक तास त्या कोरोना वार्डसमोर उभा होता, पण कुणीही कर्मचारी फिरकला नाही.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही, इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हात झटकले. काही कर्मचारी कोरोना संशयित रुग्ण म्हणून पळून गेले.
त्यानंतर उस्मानाबाद लाइव्हने पुराव्याच्या आधारे बातमी दिल्यानंतर त्यास कोरोना वार्ड मध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीची तपासणी केली असता तो ठणठणीत निघाला, पण याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार समोर आला. यातून जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गलांडे यांची बेफिकीर वृत्ती दिसून आली. कोरोना सारख्या गंभीर आजारावर जिल्हा शासकीय रुग्णालय दक्ष नाही हे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. त्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. गलांडे ताळ्यावर आले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांच्यावर कारवाईची मागणी
डॉ. गलांडे यांनी, समुद्रवाणीच्या प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्यास तसेच आणि उस्मानाबादच्या अपघात विभागातील १७ मार्च रोजी ड्युटी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
समुद्रवाणीचा संबंधित व्यक्ती ठणठणीत असताना, स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याने संशयित कोरोना रुग्ण म्हणून पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच तो रुग्ण उस्मानाबादला आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कसे बेफिकीर आणि निष्काळजीपणा वागतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याप्रकरणी काय कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.