आ. कैलास पाटील यांचा विधानसभेत आवाज घुमला...

 
उस्मानाबादच्या विविध मागण्या मांडल्या.. 

आ. कैलास पाटील यांचा विधानसभेत आवाज घुमला...
मुंबई - विधानसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पिय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करत असताना उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला व शासनाच्या जलसंपदा , ग्रामविकास ,ऊर्जा , महसूल , नगरविकास व  कृषी या विभागाच्या चर्चेत मतदारसंघातील अतिशय मुख्य व जिव्हाळ्याचे खालील मुद्दे सभागृहात मांडले.


1) उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा 21 TMC कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प व या प्रकल्पासाठी गेल्या वर्षीची तरतूद खर्च करणेस गेल्या सरकारने थांबलेली स्थगिती उठवावी व पूर्ण निधी खर्च करावा

2)उस्मानाबाद कळंब तालुक्यातील मुख्य रस्ता ते गावापर्यंत चे ग्रामीण मार्ग अत्यंत खराब झाले आहेत व ते दुरुस्त करणेस जि प कडे निधी नसल्याने ते दुरुस्त होत नाहीत त्यामुळे शासनाने CMJSY च्या योजनेत सुधारणा करून मुख्य मार्ग ते गावापर्यंत चे रस्ते प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती कार्यक्रमात घ्यावे

3) जिल्ह्यातील अनेक देवस्थानाच्या जमिनी शेतकरी कसतात मात्र सात बारा नावावर नसल्याने पीक विमा व नैसर्गिक आपत्ती अनुदान शेतकऱ्याना मिळत नाही त्यामध्ये सुधारणा कराव्यात व यापुढे अनुदान देण्यात यावे

4) महावितरण कडील अति दबाव असलेले मंजूर DP , FIDER व सब स्टेशन तात्काळ करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याच्या शेतीसाठी चांगल्या प्रकारे वापर करता येईल

5) उस्मानाबाद शहरातील महत्वकांक्षी भुयारी गटार योजना प्रकल्प तात्काळ मंजूर करावा व पूर्ण करावा

6) मंजूर असलेल्या  पोखरा योजनेचे काम सध्या तात्पुरते बंद असून प्रस्ताव घेणे व अनुदान वाटप सुरू करावे

From around the web