दिलासा : आजपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी

 
दिलासा : आजपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी


नवी दिल्ली - गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे कुलूपबंदी असलेली गल्लीबोळातील  दुकाने आजपासून उघडण्यास परवानगी देण्यात आहे.  या दुकानांमध्ये काम करणाऱ्यानी  लॉकडाऊनसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले पाहिजे. पण शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी नाही.तथापि,हॉटस्पॉट्स आणि कंटेन्ट झोनमध्ये कोणतीही सूट नसल्याचेही केंद्रीय गुह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.



गृह मंत्रालयाचा हा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान शनिवारपासून सुरू होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने १ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशात बदल करुन असे सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान, देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दुकाने व आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणीकृत आणि नगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात रहिवासी एकल दुकाने तसेच आवारात आणि लगतच्या शेजारच्या (रस्त्याच्या आसपासची) दुकाने उघडणे परवानगी आहे.

या दुकानांमध्ये केवळ 50 टक्के कर्मचारी काम करतील असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यांना मास्क घालावे लागेल आणि  सोशलडिस्टन्सिंग  (शारीरिक अंतर ) राखत लॉकडाउनची परिस्थिती राखली पाहिजे. 24 मार्चपासून बंद असलेली स्ट्रीट मोहल्ल्यांची दुकाने सरकारच्या निर्णयाने उघडण्यात येतील आणि यामुळे लाखो लोकांचा मोठा दिलासा मिळेल. .


मॉल्समध्ये दुकाने उघडणार नाहीत

मल्टी आणि सिंगल ब्रँड मॉलमधील दुकानांना ही सवलत मिळणार नाही. म्हणजेच मॉलमध्ये दुकाने उघडणार नाहीत. नगरपालिका क्षेत्रात आसपासची दुकाने उघडणे परवानगी असेल. परंतु महानगरपालिका क्षेत्रातील बाजार परिसरातील दुकाने 3 मेपर्यंत बंद राहतील.

महत्वाचं म्हणजे या सवलती हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू नाहीत.  आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला अशीच दुकानं सुरू होती. आता त्यात बदल करुन इतर दुकानं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र हे करताना सोशल डिस्टन्सिंग तसंच मास्क घालणे बंधनकारक आणि दुकानांमध्ये 50 टक्केच  कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी, असा नियम घातला आहे. मोठी दुकानं तसेच विविध ब्रँडची मॉलसारखी दुकानांना ही सवलत नाही.


दिलासा : आजपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी

मद्यविक्री बंदच
याव्यतिरिक्त ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तूं पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मद्य विक्री करणाऱ्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचंही स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. दरम्यान, राज्यांनी किंवा केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या कॅन्टोनमेंट झोन किंवा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं

राज्य सरकार मात्र आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. तसंच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच काम करणाऱ्यांना मास्क घालणं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
आजपासून ही दुकानं सुरु होणार
  • ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने सुरु होतील
  • शहरी भागात एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकाने उघडी राहतील
  • तर मार्केट एरियातली, मॉल्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहतील
  • ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्याही फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच डिलीव्हरी करु शकतात
  • लॉकडाऊन दरम्यान रेशन, भाजीपाला आणि फळांच्या दुकानासह केवळ आवश्यक वस्तू असलेली दुकाने उघडण्याची परवानगी आधीपासूनच आहे.
  • दुकाने केवळ 50 टक्के कर्मचार्‍यांसह आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून उघडता येऊ शकतात.
हे मात्र बंदच राहणार
  • दारुची दुकाने बंदच राहतील
  • शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स अद्याप उघडणार नाहीत
  • कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने देखील उघडण्यास परवानगी नाही
  • महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील मल्टी-ब्रँड आणि सिंगल मल्टी-ब्रँडची दुकाने उघडणार नाहीत.
  • सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, थिम पार्क, थिएटर, बार बंद राहील.
  •  सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद

उस्मानाबादला होणार फायदा 

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, जे तीन रुग्ण होते ते बरे झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्हा सध्या कोरोना मुक्त असल्याने आणि ग्रीन झोन असल्याने गृह मंत्रालयाच्या या निर्णयाचा उस्मानाबाद जिल्हयाला फायदा होणार आहे. त्यासाठी नियमावली असेल आणि तसा आदेश जिल्हाधिकारी काढतील, अशी अपेक्षा आहे. 

From around the web