कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात तेरा रुग्णाची भर

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात तेरा रुग्णाची भर


उस्मानाबाद - जिल्ह्यात आज एकूण १३  रुग्णाची  भर पडली. दुपारी कालच्या पेंडिंग रिपोर्ट मधील ९ जण पॉजिटीव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा  दोन जण पॉजिटीव्ह आले असून दोन्ही रुग्ण नालगाव ( ता. परंडा ) येथील आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यतील परंतु बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह  येऊन तेथेच उपचार घेणाऱ्या दोन  रुग्ण आज आपल्या जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी एक रुग्ण उस्मानाबाद येथील असून तो पुणे येथे उपचार घेत असून दुसरा रुग्ण गिरवली ता. भूम येथील आहे. त्यामुळे  आज जिल्यात 13 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.आज ४ जुलै रोजी .रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 पॉजिटीव्ह, 138 नेगेटिव्ह, व 17 पेंडिंग असा रिपोर्ट प्राप्त  झाला आहे.


३ जुलै  रोजी पाठवलेल्या स्वाब  पैकी 23 रिपोर्ट्स पेंडिंग होते, ते आज दुपारी प्राप्त झाले असून त्यात 9 पॉजिटीव्ह 2 निगेटिव्ह  व 12 अनिर्णित रिपोर्ट   आले आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यतील परंतु बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह  येऊन तेथेच उपचार घेणाऱ्या दोन  रुग्ण आज आपल्या जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी एक रुग्ण उस्मानाबाद येथील असून तो पुणे येथे उपचार घेत असून दुसरा रुग्ण गिरवली ता. भूम येथील आहे. त्यामुळे  आज जिल्यात 13 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

पॉजिटीव्ह रुग्ण  माहिती पुढील प्रमाणे आहे.

एक रुग्ण उमरगा शहरातील आहे. दोन रुग्ण  उमरगा  तालुक्यातील असून त्यापैकी एक एकोंडी व दुसरा गुंजोटी येथील आहे.

आठ  रुग्ण  परांडा तालुक्यातील असून त्यापैकी चार रुग्ण प्रॉपर परांडा येथील, तीन रुग्ण  नालगाव व एक रुग्ण  आवार पिंपरी येथील आहे.
कोरोना अपडेट 

एकूण बाधीत रुग्ण - २६८ 

बरे झालेले रुग्ण - १८६ 

मृत्यू - १३ 

ऍक्टिव्ह रुग्ण - ६९ 


संस्था निहाय उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती.

जिल्हा शासकीय  रुग्णालय  उस्मानाबाद -23.
उपजिल्हा रुग्णालय,  तुळजापूर - 22.
विजय क्लीनिक (DCHC)उमरगा - 05.
शेंडगे हॉस्पिटल (DCHC)उमरगा) -01.
कोरोना केयर सेंटर कळंब -10.
शा. वै. म. लातूर -03.
पुणे -01.
सोलापूर -03.
बार्शी -01.
...
असे एकूण -69.

From around the web