कोरोना : ३ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सात पॉजिटीव्ह
Jul 3, 2020, 22:37 IST
उस्मानाबाद - ३ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यात तुळजापूर तालुक्यातील तीन, उमरगा - लोहारा तालुक्यातील दोन आणि उस्मानाबाद तालुक्यातील दोन असा समावेश आहे..
आज ३ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून 192 स्वाब लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सात पॉजिटीव्ह, 5 अनिर्णित आणि 157 निगेटिव्ह, २३ पेंडिंग असा रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.
पॉजिटीव्ह रुग्ण तुळजापूर शहरातील दोन ( त्यात उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी ) खडकी तांडा येथील एक, तसेच लोहारा - उमरगा तालुक्यातील तुरोरी १, बलसूर १, त्याचबरोबर उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागातील एक आणि कनगरा ता. उस्मानाबाद येथील एक आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यास कोरोना
धक्कादायक बाब म्हणजे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अन्य कर्मचारी धास्तावले आहेत.
कोरोना बाधित रुग्ण - २५५
बरे झालेले रुग्ण - १८४
मृत्यू - १२
एक्टीव्ह रुग्ण - 59
उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलद गतीने वाचण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊनलोड करा..
Osmanabad Live News App