कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १९ रुग्णाची भर
Jul 11, 2020, 19:08 IST
जिल्हा कारागृहातील सहा कैदी कोरोना बाधित
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात १९ कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील दहा , भूम तालुक्यातील पाच, उमरगा तालुक्यातील चार असा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून सहा कैदी कोरोना बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.
सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून दि. ९ आणि १० जुलै रोजी शासकीय वैदकीय महाविद्यालय लातूर व स्वा. रा. ति. शा. वै. महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठवलेले स्वाब रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 19 रिपोर्ट्स पॉजिटीव्ह आले आहेत त्यामुळे आज एकूण 19 पॉजिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे.
पॉजिटीव्ह रुग्णाची माहिती.
उस्मानाबाद तालुका -१०
त्यापैकी एक शेकापूर, एक तुगाव, व दोन उस्मानाबाद शहरातील असून एक राम नगर उस्मानाबाद व एक नेहरू चौक उस्मानाबाद येथील आहे.त्याचबरोबर उस्मानाबाद जेल मधील सहा कैदी आहेत, हे सर्व सहा जण अलगीकरण विभागात ठेवण्यात आलेले आहेत व त्यांना विशेष विभागात ठेवण्यासाठी प्रक्रिया चालू आहे.
भूम तालुका -५
एक वालवड, चार राळेसांगवी ता. भूम येथील आहेत.
उमरगा तालुका -४
तीन उमरगा शहर व एक मुरूम.
एकूण पॉजिटीव्ह रुग्ण -354.
आजपर्यंतचे डिस्चार्ज -228.
आज पर्यंतचे मृत्यू 14.
उपचार घेत असलेले रुग्ण -112.
उपचार घेत असलेले रुग्ण व संस्था.
सा. रु. उस्मानाबाद -27.
आयुर्वेदिक म. उस्मानाबाद -12.
उप. जि. रु. तुळजापूर -02.
कळंब ccc -28.
उप. जि. रु. उमरगा -18.
विजय क्लिनिक उमरगा -08.
शेंडगे हॉस्पिटल उमरगा -02.
सोलापूर -08.
लातूर -05.
पुणे -01
बार्शी -01.
असे एकूण 112.
Reply Forward
|