कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात १५ जुलै रोजी १३ कोरोना बाधीतांची भर

 

कोरोना  : उस्मानाबाद जिल्ह्यात १५ जुलै रोजी १३ कोरोना बाधीतांची भर


 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात १५ जुलै (बुधवारी ) तेरा कोरोना  रुग्णाची भर पडली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने जिल्ह्यात आजपर्यंत २० जणांचा बळी घेतला आहे.

सामान्य रुग्णालय,उस्मानाबाद येथून 105 स्वाब नमूने तपासणीसाठी स्वा.रा.तिर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी  पाच पॉजिटीव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.


उस्मानाबाद तालूका- 1.

➤50 वर्ष पुरुष रा. खडकपुरा, उस्मानाबाद.

उमरगा तालुका- 1.

➤50 वर्षे महिला रा. धनश्री कॉलनी, उमरगा.

तुळजापूर तालुका -2

➤39  वर्षे पुरुष रा.वडगाव (देव )
➤13 वर्षीय मुलगी रा. जळकोट.

टीप -55 वर्षीय महिला रा. आळंद (कर्नाटक ), उमरगा येथे पॉजिटीव्ह आली आहे, तिला आपल्या जिल्ह्यात  तात्पुरते समाविष्ट केले आहे.

रॅपिड अँटीजेन किट्स च्या माध्यमातून दि. 15/07/2020 रोजी तपासणीअंती 05 रुग्ण पॉजिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले, त्यांची माहिती खालीलप्रमाणे.

1)-20 वर्षीय पुरुष रा. माळी गल्ली, खिरणी मळा, जवळ, उस्मानाबाद.
2)-59 वर्षीय पुरुष रा, उपळा (मा ), ता. उस्मानाबाद.
3)- 40 वर्षीय महिला रा. खानापूर ता. उस्मानाबाद.
4)- 17 वर्षीय पुरुष रा. खानापूर ता. उस्मानाबाद.
5)-55 वर्षीय पुरुष रा. रत्नापूर ता. परांडा.

 दिनांक 15/07/2020 रोजी बाहेर जिल्हयात पॉझिटिव्ह आलेला व तेथेच उपचार घेत असलेले 03 रुग्ण आज आपल्या जिल्हयामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

१) 60 वर्षे पुरुष रा.बाऊची ता. परांडा  (बार्शी  येथे उपचार  घेत आहे.)
2) 60 वर्षीय पुरुष रा.  कळंब (सोलापूर  येथे उपचार घेत आहे ).
3) 69 वर्षीय पुरुष रा. मुरूम ता. उमरगा ( लातूर येथे उपचार घेत आहे ).
आज दिनांक 15/07/2020 रोजी  कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालेला आहे.
  1)    65 वर्षे पुरुष रा.गुंजोटी ता उमरगा (उच्च रक्तदाब व मधुमेह ).
2)  66 वर्षीय पुरुष रा. तुरोरी ता. उमरगा ( उच्च रक्तदाब व श्वसन विकार )

आज एकूण 13 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

आज पर्यंतचे एकूण रुग्ण संख्या 449.
➤ एकूण डिस्चार्ज 272.
➤ एकूण मृत्यू 20.
➤ एकूण उपचाराखालील रुग्ण 157.

From around the web