सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

लोहारा: 1)अमोल राजेंद्र गव्हाळे 2)सुजित गव्हाळे 3)शिवदर्शन गव्हाळे 4)उत्तम गव्हाळे 5)भालचंद्र गव्हाळे 6)श्रीराम गव्हाळे 7)राजेंद्र गव्हाळे 8)विजय मारोती वाघमारे सर्व रा. खेड, ता. लोहारा यांनी दि. 17.10.2020 रोजी 16.00 वा. सु. जुने गावठाण खेडकडे जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 43 चा अंदाजे 30 मीटर भाग एक्सकॅव्हेटर यंत्राच्या सहायाने विनापरवाना खोदुन शासकिय मालमत्तेचे नुकसान करुन जनतेला येण्या जाण्यापासुन अडथहा निर्माण केला. यावरुन बांधकाम विभागाचे सहा. अभियंता- श्री. संजय विभुते यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 149, 341, 431 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम- 3 (2) (क) अन्वये गुन्हा दि. 03.11.2020 रोजी नोंदवला आहे.

कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन, गुन्हा दाखल 

 उस्मानाबाद -  1)इब्राहीम 2)मैनु शेख, दोघे रा. उस्मानाबाद यांसह अन्य 8 व्यक्तींनी दि. 03.11.2020 रोजी दुपारी 12.00 वा. सु. बाजार चौक, उस्मानाबाद येथे फ्रान्स देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे छायाचित्र लावलेला प्रतिकात्मक गवताचा पुतळा जाळुन आंदोलन करतांना कोविड- 19 संबंधी विविध मनाई आदेशंचे उल्लंघन केले. यावरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोउपनि- श्री दिनेश जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 आणि आपत्ती निवारण कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 03.11.2020 रोजी नोंदवला आहे.

From around the web