धाराशिवमध्ये आर्थिक व्यवहारावरून तरुणाचे अपहरण करुन मारहाण 

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे- विशाल सुरेश गायकवाड, वय 24 वर्षे रा. अंबेहोळ, ता. जि. उस्मानाबाद यांना आर्थिक व्यवहाराच्या  कारणावरुन दि.12.07.2023 रोजी 10.30 वा. सु तुळजाभवानी स्टेडीयम ते फिल्टर टाकी आर्येुदीक कॉलेजच्या पाठीमागे उस्मानाबाद येथे आरोपी नामे 1) आण्णा चंद्रसेन पाटील रा. अंबेहोळ, ता.जि. उस्मानाबाद 2) सुग्रीव लोंखडे रा. खानापूर, ता.जि. उस्मानाबाद 3) अशोक लोखंडे रा. खानापूर, ता.जि. उस्मानाबाद 4) अक्षय मथे रा वैराग ता. बार्शी जि. सोलापूर सर्वांनी संगणमत करुन विशाल गायकवाड यांना होंडाई ॲसेंट गाडीमध्ये नेवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने, काठीने, चाकुने मारहान करुन जखमी केले. पुन्हा व्यावहारात पडला तर तुला जिवे ठार मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या विशाल गायकवाड यांनी दि.15.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-365, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तक्रार अर्ज दिल्यावरून मारहाण 

तुळजापूर  : सरपंचपद रद्द करणे बाबत तक्रारी अर्ज करण्याचे कारणावरुन आरोपी नामे- 1)सचिन जयकुमार देशमुख, 2)संदीप विलास देशमुख, 3) रोहन दिपक उंबरे, 4)दिनेश कालीदास देशमुख, 5)सुर्यकांत नारायन देशमुख, 6)सिध्देश्वर भारत पवार, 7)ज्योतीबा वैजिनाथ भिसे, सर्व रा. शिराढोण, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी फिर्यादी नामे- विठ्ठल श्रीपती सोनवणे, वय 71 वर्षे यांना दि.14.07.2023 रोजी 17.30 वा. सु. शिराढोण शिवार येथे फिर्यादीच्या शेतात शेत गट नं 48 येथे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी सचिन देशमुख यांनी विठ्ठल सोनवणे यांना सत्तुरने नडगीवर व पंजावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच आरोपी नामे संदीप देशमुख व जोतीबा भिसे यांनी लोखंडी रॉडने व आरोपी सुर्यकांत देशमुख सिध्देश्वर पवार  यांनी विठ्ठल सोनवणे यांचे पायावर व हातावर काठीने मारहान केली. तर रोहन उंबरे यांनी चाकुने उजवे पायावर मारहान करुन गंभीर जखमी केले. आरोपी नामे- दिनेश देशमुख यांनी कोयत्याने उजवे पायाचे नडगीवर मारहान करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विठ्ठल सोनवणे यांनी दि.15.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-307, 326,  504, 506, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web