येरमाळा  : चोरीच्या ट्रकसह आरोपी 24 तासांत अटकेत

 
w

येरमाळा : येरमाळा ग्रामस्थ- विलास गोरोबा थोरबोले यांनी त्यांचा हिरव्या रंगाचा ट्रक क्र. एम.एच. 04 एएल 6830 हा दि. 14.11.2021 रोजी 22.00 वा. सु. गावातील विवेक हॉटेलसमोरुन व्यक्तीने चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या विलास थोरबोले यांनी दि. 17 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तपासादरम्यान येरमाळा पो.ठा. चे प्रभारी अधिकारी सपोनि- श्री. संदीप मोदे, पोहेकॉ- नितीन पाटील, पोना- सांडसे यांनी गतीमान तपासकरुन दहिफळ, ता. धारुर, जि. बीड येथून गणेश बडे यास आज दि. 18.11.2021 रोजी ताब्यात घेउन चोरीचा नमूद ट्रक त्याच्या ताब्यातून जप्त केला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

तुळजापूर  : नांदेड जिल्ह्यातील चालक- मारुती श्रीरामे हे दि. 17.11.2021 रोजी 11.00 वा. काक्रंबा येथील महामार्गाने ट्रक चालवत जात होते. यावेळी एका अनोळखी पुरुष मोटारसायकलवर ट्रक ओलांडून पुढे आला. ट्रकने कट मारल्याचा वाद त्याने निर्माण करुन आपली मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एपी 7197 ही ट्रकला आडवी लावून ट्रक चालक- मारुती यांस लाथाबुक्क्यांनी मारहान करुन त्यांच्या सदऱ्याच्या खिशातील 2,000 ₹ हिसकावून नेली. अशा मजकुराच्या मारुती श्रीरामे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : निलेगाव ग्रामस्थ- मंगय्या स्वामी यांच्या ताब्यातील शेत विहिरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप दि. 13- 14.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या स्वामी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web