येरमाळा : ऊसाच्या  शेतात नेऊन विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार 

 
crime

येरमाळा : एका गावातील एक 23 वर्षीय महिला(नाव- गाव गोपनीय) दि.01.06.2021  रोजी 17.00 ते दि. 14.05.2023 रोजी 17.30 वा. सु. सदर महिलेस गावातील एका तरुणाने वांरवार फोनवर छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देवून तिस उसाचे शेतात नेऊन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तिच्या नवऱ्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.19.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376(2)(एन),506, 507 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 गडदेवदरी येथे हाणामारी 

धाराशिव  : गडदेवदरी, ता. उस्मानाबाद येथील- असलम इब्राहिम मुजावर, कलीम मुजावर, कय्युम मुजावर, रशिद गणी मुजावर या सर्वांनी पुजेला इथे का आलास कारणावरुन दि.25.05.2023 रोजी 20.30 वा.सु. गडदेवदरी देवस्थान येथे तेरखेडा, ता. वाशी येथील- इक्बाल अफजल मुजावर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगडाने, लाकडाने मारहान करुन जखमी केले. तसेच इक्बाल यांचा  पुतण्या त्यांचे बचावास आला असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने, लाकडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या इक्बाल मुजावर यांनी दि. 19.06.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रस्ता अपघातात एक ठार 

नळदुर्ग  : अलगुड, ता. बस्वकल्याण येथील-विशाल तुकाराम ओकावाले, सोबत तुकाराम नामदेव बिराजदार वय 45 वर्षे, हे दोघे दि.18.06.2023 रोजी 23.00 वा. सु. कल्याणी बिऱ्याणी हॉटेल समोर नळदुर्ग येथे ट्रक क्र केए 56 1441 मधुन जात होते. दरम्यान  विशाल यांनी त्यांचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अचानक ब्रेक दाबल्याने तुकाराम हे ट्रक मधुन खाली पडून गंभीर जखमी  होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या महाविर ज्ञानेश्वर बिराजदार यांनी दि.19.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                                                                

From around the web