येडशी : महिला वनरक्षकाशी हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल  

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे- उषा शंकर जाधव, वय 29 वर्षे, धंदा नोकरी वनरक्षक रा. येडशी, ता. जि. उस्मानाबाद या दि. 09.08.2023 रोजी 15.00 वा. सु. वन विभाग कार्यालय, येडशी  येथे शासकीय काम पार पाडत असताना आरोपी नामे दत्त मोहन तुपे, रा. येडशी ता.जि. उस्मानाबाद यांनी उषा जाधव यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून लज्जा वाटेल अशा प्रकारची धक्काबुक्की करुन  शासकीय कमात अडथळा निर्माण केला. यावरुन उषा जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 353, 323,  506,  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.   

परस्पर विरोधी फिर्यादी दाखल   

आरोपी नामे- उषा शंकर जाधव, वय 29 वर्षे वन विभाग येडशी यांनी  दि.09.08.2023 रोजी 13.30 वा. सु. वन विभाग कार्यालय येडशी येथे फिर्यादी नामे- दत्ता मोहन तुपे, वय 29 वर्षे रा. शिवाजी महाराज चौक, येडशी जि. उस्मानाबाद यांनी वन विभाग कार्यालय येडशी येथे दिलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी गेले असता जाधव यांनी तुम्ही कार्यालयाकडे येण्याचा संबंध नाही असे म्हणून कार्यालयाचे बाहेर काढून मुरमाचा दगड डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या दत्ता तुपे यांनी दि.09.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

          

                                                 

From around the web