धाराशिव शहरात मोटारसायकलने धडक दिल्याने महिला जखमी 

 
crime

धाराशिव  : जखमी नामे जयश्री पांडूरंग गाडे, वय 65 वर्षे रा. गणेश नगर   या दि.19.08.2023 रोजी 20.30 वा. या घरापासून पायी जात होत्या दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 8883 चा अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून जयश्री गाडे यांना पाठीमागून धडक दिली.

यात जयश्री गाडे यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. नमुद मोटरसायकल अज्ञात चालक हा अपघात स्थळावरुन मोटरसायकल सह पसार झाला. अशा मजकुराच्या जयश्री गाडे यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम 134 अ ब अन्वये गुन्हा नोंदवला आहे.     

  मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

ढोकी : आरोपी नामे-1) गंगाभ्षिण गुलाबचंद भुतडा, वय 61 वर्षे, रा. ढोकी, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 21.08.2023 रोजी 09.30 वा. सु. आपल्या ताब्यातील स्कुटी क्र एमएच 25 एएन 1839 ही पेट्रोलपंप चौक ढोकी येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द ढोकी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.     

From around the web