तुळजापुरात महिलेची फसवणूक, ३८ तोळे सोने बुडवले
तुळजापूर : फिर्यादी नामे- अस्मिता दत्तात्रय शिंदे, वय 19 वर्षे, रा. नंदनवन कॉलनी, न्यु दत्त नगर वाकड पुणे यांचे ओळखीचे आरोपी नामे- अजय कैलास भोसले, रा. नेकनुर ता. जि. बीड, 2) अविनाश पवार, रा. पुणे यांचेवर विश्वास ठेवून अस्मिता शिंदे यांनी दि.05.09.2023 रोजी रुद्र सिटी तुळजापूर येथे नमुद आरोपी यांचे कडे 38 तोळे वजनाचे सुवर्ण दागिने अंदाजे 19,15,000₹ किंमतीचे दिले असता ते त्यांनी परत न करता अस्मिता शिंदे यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी अस्मिता शिंदे यांनी दि.05.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापुर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 406, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शेतकऱ्याची फसवणूक
अंबी : आरोपी नामे-1) दिलीप चांगदेव गव्हाणे, वय 48 वर्षे, 2) मंगेश दिलीप गव्हाणे, वय 23 वर्षे, 3) मुद्रीका दत्तु शिकेतोडे, वय 62 तिघे रा. आंतरवली ता. भुम, 4) दिपक बाबुराव कोकाटे, 5) विकास दत्तु शिकेतोडे दोघे रा. हिवरे तर्फे नारायणगाव ता. जि. पुणे यांनी फिर्यादी नामे- योगीराज गव्हाने, वय 41 वर्षे, रा. आंतरवली, ता. भुम जि. धाराशिव यांनी नमुद आरोपी फिर्यादी सोबत 80 आर जिरायत शेतीची इसार पवाती करुन दिली होती परंतु त्यांना अंधारात ठेवून फिर्यादीची फसवणुक करण्याचे उद्देशाने नमुद आरोपीने सदर जमिन ही दुऱ्याच कोणाला तरी विकून फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादी यांनी फौ. कि. अर्ज नं 120/2023 वरुन जा. क्र फौजविभाग/2462/2023 वरुन मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट नं 2 भुम दि. 26.09.2023 रोजीचे कागदपत्रावरुन दि.27.09.2023 रोजी दिलेल्या अंबी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-463, 464, 471, 474, 323, 504, 506(2), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.