कळंब बस डेपोमध्ये तरुणीचा राडा

आगारातील पेट्रोल पंपावर जावून बसून गाड्या मध्ये पेट्रोल भरण्यास केला अडथळा 
 
crime

कळंब  : कळंब बसस्थानकातील  डेपोमध्ये  एका तरुणीने  राडा करून तेथील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी हुज्जत घालुन आगारातील पेट्रोल पंपावर जावून बसली व गाड्यामध्ये पेट्रोल भरण्यास अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.. 

आरोपी नामे- तेजस्विनी राजाभाउ खाडे, वय 22 वर्षे, रा. देवळाली ता. कळंब जि. धाराशिव हिने कळंब बसस्थानकात बसमधून खाली उतरुन बस डेपोतील अधिकारी व कर्मचारी वाहक चालक यांच्याशी हुज्जत घालुन गोंधळ घालुन तेथील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी हुज्जत घालुन आगारातील पेट्रोल पंपावर जावून बसली व गाड्यामध्ये पेट्रोल भरण्यास अडथळा निर्माण केला.

 त्यामुळे  बस बराच वेळ तेथेच थांबवुन राहिल्याने शासकिय कामात आडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी रामदास सुखदेव भराटे, वय 50 वर्षे, व्यवसाय एस. टी. चालक रा. पारा, ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.25.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-353, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web