धाराशिव : मोबाईलवरून महिलेस बेदम मारहाण 

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे-1) विशाल बाळु लोंढे, रा. उस्मानाबाद यांनी मोबाईल देण्याचे कारणावरुन दि.22.07.2023 रोजी 19.00 वा. सु. तुळजापूर नाका, पापनाश नगर, उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे- जालींदर हरी मगर, वय 55 वर्षे रा.  तुळजापूर नाका, पापनाश नगर, उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांची भावजई शामल मगर यांना आरोपी विशाल लोंढे म्हणाला की, फिर्यादीचा मोबाईल मला द्या त्यावर शामल मगर म्हणाल्या की पैसे द्या मोबाईल घेवून जा असे बोलण्यावरुन  त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहान केली.   शामल मगर यांचे बचावास जालींदर मगर हे आले असता त्यासही लोखंडी सळईने मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जालींदर मगर यांनी दि.24.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 294, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी  : आरोपी नामे-1) रोहीत विनोद वाघमोडे, रा.करजखेडा ता. जि. उस्मानाबाद यांनी पाण्याची मोटर बंद करण्याच्या कारणावरुन दि.24.07.2023 रोजी 11.00 वा. सु. फिर्यादी यांचे घरी करजखेडा उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे-विनोद शेषेराव वाघमोडे, वय 60 वर्षे, करजखेडा, ता.जि. उस्मानाबाद यांनी मोटर जळेल म्हणून मोटर बंद केली असता आरोपी रोहीत वाघमोडे यांनी शिवीगाळ करुन सळईचा तुकड्याने  फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी विनोद वाघमोडे यांनी दि.24.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 504, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web