धाराशिव , नळदुर्ग, उमरगा येथे हाणामारी 

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे-1)किरण महादेव लगदिवे,2)सचिन विधाते,3)बालाजी विधाते,4) आकाश विधाते,5) योगेश विधाते सर्व रा. शेकापूर ता. जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.20.08.2023 रोजी 04.45 वा. सु. शेकापूर शिवार गट नं 63 येथे फिर्यादी नामे- मंगल रामलिंग शिराळे वय 55 वर्षे, रा. शेकापूर ता. जि. उस्मानाबाद यांना तुझा मुलगा गणेश कोठे आहे तो आमच्याशी भांडण तंटे करतो असे म्हणून गैरकायदयाची मंडळी जमवून शिवीगाळ करुन दगडफेक करुन दहशत निमार्ण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मंगल शिराळे यांनी दि.20.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 149, 336, 504,506, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
धाराशिव  :आरोपी नामे- 1)गणेश आप्पाराव शिराळे, 2)किशोर हानुमंत लगदिवे 3) आकाश विठ्ठल पिसे, 4) मिठू लगदिवे सर्व रा. शेकापूर, ता. जि.उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.20.08.2023 रोजी 17.30 वा. सु. साळुंके नगर जगदंबा हॉटेल समोर उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे देवराज बाबासाहेब विधाते, वय 21 वर्षे रा.शेकापूर, ता. जि. उस्मानाबाद यांना साळुंके नगर जगदंबा हॉटेल समोर उस्मानाबाद येथे रस्त्यात आडवून जुन्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या देवराज विधाते यांनी दि.20.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 341, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  :आरोपी नामे-1) तिरुपती धनाजी लोमटे,2)अनिकेत धनाजी लोमटेदेाघे रा.सलगरा(दिवटी) ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद यांनी  दि.18.08.2023 रोजी 14.00 ते 20.00 वा. सु. सलगरा शिवार येथे फिर्यादी नामे बंडू आनंदा सोनवणे, वय 40 वर्षे रा.सलगरा(दिवटी) ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद यांची मुलगी ही आरोपी यांच्या प्लॉट जवळील शेतात शौचास गेली होती म्हणून यांनी  फियादीच्या मुलीस शिवीगाळ केली होती. त्याबाबत फिर्यादी हे आरोपी यांना त्यांचे घरा समोर जावून विचारपूस करण्यास गेले असता  फिर्यादी यांना यातील आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी बंडू सोनवणे यांनी दि.20.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3(1)(आर),3(1)(एस), 3(2) (व्हिए) नागरी संरक्षण अधि कलम 7(1)(ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  :आरोपी नामे-1) चनवीर तुकाराम बाबुगळ, रा. भुसनीवाडी 2)अविनाश धनराज राठोड, रा.व्यंकटेश नगर, कदेर, ता. उमरगा जि.उस्मानाबाद यांनी फिर्यादी नामे विनोद लिंबाजी जाधव, वय 35 वर्षे रा.सरदार नगर, तांडा कदेर, ता. उमरगा जि.उस्मानाबाद यांचे भावासोबत झलेली तक्रार मिटवायचे आहे असे म्हणून बोलावून दि.20.08.2023 रोजी 02.00 वा. सु. मुरळी तलावाकडे जाणारे रोडवर पाण्याच्या टाकीजवळ कदेर येथे फिर्यादी नामे विनोद लिंबाजी जाधव, वय 35 वर्षे रा.सरदार नगर, तांडा कदेर, ता. उमरगा जि.उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटरने मारहाण करुन जखमी केले. तसेच  तक्रार देण्यास गेला तर घोडा आणून गोळ्या घालून ठार मारतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या विनोद जाधव यांनी दि.20.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web