वाशी : लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा नोंद

 
crime

वाशी  :आरोपी नामे-1) सुर्यकांत शहाजी सांडसे, 2) भागवत भास्करराव कवडे, 3) विनोद हरीभाउ माने रा. सर्व वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी दि.08.09.2023 रोजी 12.45 वा. सु. महावितरण कार्यालय वाशी येथे ऑफीसमधील फोनवर फोन करुन मी ॲड. सांडसे बोलत आहे, सारोळा येथे लिंक लाईनचे कामाचे काय झाले ती लोक उपोषनाला बसली आहेत असे म्हणाला असता फिर्यादी नामे- जोर्तिलिंग शिवाजी हिंगमिरे, वय 42 वर्षे, व्यवसाय (सहा अभियंता) रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद ह.मु. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद  यांनी “सदरील काम करण्यास महावितरण तयार आहे, उपोषनकर्त्यांना समजावून सांगितले आहे” असे  सबंधीत आरोपी यांना फोनवरुन सागिंतले. त्यानंतर फिर्यादी हे महावितरण कार्यालय वाशी येथे सरकारी काम करत असताना नमुद आरोपी यांनी महावितरण कार्यालय वाशी येथे ऑफीसमध्ये येवून फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून फायबरचे खुर्चीने मारहाण केली व शासकिय काम पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन ज्योतिलिंग हिंगमिरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 332, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मालमत्तेविरुध्द गुन्हे

 धाराशिव  : फिर्यादी नामे- पुष्पा रंगराव शिंदे, वय 65 वर्षे, रा. 11 नंबर शाळे समोर पुष्परंग निवास समतानगर ता. जि. उस्मानाबाद यांचे वडगाव सि. शिवारातील शेत गट नं 253 येथील शेततळ्यावरील के.बी. आर. ऑपन वेल 3 एच पी पानबुडी सिंगल फेस मोटर अंदाजे 21,000₹ व 95 मिटर वायर अंदाजे 9,000₹ असा एकुण 30,000₹ किंमतीची,साहित्य हे दि. 07.09.2023 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी पुष्पा शिंदे यांनी दि.08.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- सुरज बाळासाहेब अरगडे, वय 24 वर्षे, तावडी, ता. बार्शी जि. सोलापूर यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची फॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 13 एएल 4400 ही दि.07.09.2023 रोजी 11.00 ते 17.30 वा. सु. कोर्ट परिसर उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी सुरज अरगडे यांनी दि.08.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
                   

From around the web