वाशी : सार्वजनिक अभिलेख गहाळ प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

वाशी : वाशी येथील सेतु सुविधा केंद्रातील कर्मचारी- कैलास रामकृष्ण बावधनकर, रा. वाशी यांनी सन- 2011 ते 2012 या कालावधीत केंद्रातील मृत्यु नोंद आदेश मुळ संचिका तहसील कार्यालय, वाशी येथील अभिलेख कक्षात जमा करणे आवश्यक असताना नमूद शासकीय दस्तऐवज जमा न करता गहाळ, नष्ट करुन त्यांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम कलम- 4, 9 चे अल्लंघन केले. यावरुन तहसील कार्यालय, वाशी येथील अव्वल कारकुन- गोवर्धन तवले यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाण्यात दि. 10.11.2021 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

उमरगा : त्रिकोळी, ता. उमरगा येथील चंद्रकांत वैजिनाथ सुरवसे यांच्या शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा ग्रीन फलो पाणबुडी विद्युत पंप दि. 07- 08.11.2021 दरम्यानच्या रात्री गावातील चार संशयीतांनी चोरुन नेल्याचा चंद्रकांत यांचा संशय आहे. अशा मजकुराच्या चंद्रकांत सुरवसे यांनी दि. 10.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : सावरगांव, ता. तुळजापूर येथील नानासाहेब शशीकांत डोके यांनी बटईने केलेल्या शेत गोठ्यात ठेवलेली एक म्हैस दि. 06- 07.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नानासाहेब डोके यांनी दि. 10.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : शुक्रवार पेठ, तुळजापूर येथील बाबाजी हरीभाऊ पुजारी यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 1789 ही दि. 30.10.2021 रोजी तुळजापूर येथील मंकावती विहीरीजवळील गल्लीत लावली असता 18.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाबाजी पुजारी यांनी दि. 10.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web