वाशी : सुनेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल
वाशी : श्रीमती अर्चना बाबु हुंबे, वय 22 वर्षे, रा. ईट, ता. वाशी यांनी दि. 02.12.2021 रोजी 19.00 वा. सु. आपल्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. अर्चना हुंबे यांच्या सासरकडील पती- बाबु विक्रम हुबे, सासरा- विक्रम हुंबे, सासु- प्रभावती हुंबे, नणंद- मिनाक्षी काटुळे, सुरेश डमरे हे कौटुंबीक कारणावरुन अर्चना यांचा वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करत होते. या छळास कंटाळून अर्चना यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयाताचा भाऊ- अशोक रामचंद्र पाटील, रा. पुणे यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 73 / 2021 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या लेखी जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 306, 304 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\
मारहाण
मुरुम : केसरजवळगा, ता. उमरगा येथील शंकर रमेश दिक्षीत हे दि. 30.11.2021 रोजी 07.30 वा. सु. गावातील रस्त्याने पायी जात होते. यावेळी ग्रामस्थ- महादेव भिमशा परीट यांनी मोटारसायकलवर तेथे जाउन शेत रस्त्याचा वाद उकरुन काढून शंकर दिक्षीत यांना शिवीगाळ करुन दगड फेकून मारल्याने शंकर यांच्या डाव्या खांद्याचे हाड मोडले. तसेच महादेव परीट यांचे भाऊ- रविंद्र व बसवराज यांनीही शंकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शंकर दिक्षीत यांनी दि. 03 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 336, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.