उमरगा :  एकूरगा शिवारातील बेकायदा डान्स बारवर पोलिसांचा छापा 

अश्लील हावभाव करणाऱ्या पाच पुरुषांसह चार महिला नृत्यांगणावर गुन्हा दाखल 
 
Osmanabad police

उमरगा  - एकूरगा शिवारातील एका बेकायदा डान्स  बारवर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा मारून पाच पुरुषांसह चार महिला नृत्यांगणावर गुन्हा दाखल केला आहे. 

दिनांक 01.12.2022 रोजी रात्री  01.30 वा उमरगा पोलीसांनी एकुरगा शिवारातील महामार्गालगतच्या विनोद बार पाठीमागे छापा टाकला. यावेळी कर्णकर्कश आवाजात संगीत यंत्रणा चालवुन चार महिला अश्लील हावभाव करत नाच करत होत्या तर अवैध दारु बाळगुन समोर बसलेले चार पुरुष त्यांना उत्तेजन देत असल्याचे आढळले. यावरुन पोलीसांनी विक्रम माने, विक्रम पवार, नवनाथ माने, ज्ञानोबा फुगटे, अमोल माने सर्व रा.माडज यासह चार महिलावर भादस कलम 188,268,294 मपोका 33 (W) , अश्लील नाच  प्रतिबंधक कायदा कलम 8 सह महाराष्ट मदय निषेध अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

याप्रकरणी पाच पुरुषांसह चार महिला नृत्यांगणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकुरगा शिवारातील चौरस्ता ते लातूर शहराकडे जाणाऱ्या महामार्गाच्या उजव्या बाजूला महेश दिगंबर सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या एका शेडमध्ये विक्रम माने, नवनाथ माने, ज्ञानोबा फुगटे, अमोल माने (सर्व रा. माडज, ता. उमरगा), विक्रम पवार (रा. उमरगा) यांनी मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टीमवर हिंदी गाणे सुरू केले होते. यावेळी स्टेजवरील अश्लिल बिभत्स हावभाव करत नृत्य करत असलेल्या नृत्यांगणावर नकली नोटा उडवत असताना हे सर्वजण आढळून आले. 

तसेच त्या व्यक्तींजवळ विनापरवाना बेकायदेशीर विदेशी दारु आणि बियर सुद्धा आढळून आली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर दारूसह म्युजिकल साऊंड सिस्टीमचे साहित्य व रोख रक्कम असे एकुण एक लाख, सात हजार ८५५ रुपयांचे साहित्य जप्त केले  आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. एस. बरकते, पोलिस कर्मचारी माधव बोईनवाड, गरड, बिराजदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, बोईनवाड यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियम, साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ आणि महिलांच्या अश्लील नृत्यास प्रतिबंध घालणे आदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. बी. कवडे करीत आहेत.

From around the web