उमरगा : सिमकार्ड जुने झाल्याचे सांगून फसवणूक 

 
Osmanabad police

उमरगा : पतंगे रोड, उमरगा येथील बालाजी महादेव कदम यांना दि. 15.01.2022 रोजी 05.15 वा. सु. दोन अनोळखी फोन क्रमांकावरुन कॉल आला. यावेळी त्या कॉलवरील व्यक्तीने, “तुमचे सिमकार्ड जुने झाले असुन ते चालू ठेवण्यासाठी व त्याच्या सत्यापनासाठी क्विक सपोर्ट ॲपलीकेशन तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा.” असे बालाजी कदम यांना सांगीतले. यावर कदम यांनी त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे ते ॲपलीकेशन फोनमध्ये घेउन त्यातील पासवर्ड समोरील व्यक्तीस सांगून आपल्या फोनवर आलेला ओटीपी लघु संदेशही त्यास सांगीतला. यावर कदम यांच्या एसबीआय बँक खात्यातील एकुण 4,64,899 ₹ कपात झाल्याचा बँकेचा लघू संदेश त्यांना प्राप्त झाला. अशा मजकुराच्या बालाजी कदम यांनी दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : कळंब तालूक्यातील एक 15 वर्षीय मुलगी दि. 17.01.2022 रोजी 21.00 वा. सु. आपल्या आजोळी असतांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web