उमरगा : अवैद्यरित्या गर्भलिंग निदानासाठी गर्भवती महिलांना घेऊन जात असलेल्या एजंट,डॉक्टर व इतर साथीदारावर फिर्याद दाखल

 
crime

  धाराशिव :- महाराष्ट्रातून परराज्यात म्हणजेच कलबुर्गी (गुलबर्गा) येथे विविध जिल्ह्यांमधून तसेच  खेड्यापाड्यातून काही एजंट मार्फत गर्भवती महिलांना  अवैद्यरित्या गर्भलिंगनिदानासाठी घेऊन  जात असल्याची खात्रीदायक माहिती पोलीस विभागात प्राप्त झाली असता पोलीस विभाग व आरोग्य विभागाचे सिव्हिल सर्जन डॉ.राजाभाऊ गलांडे यांच्या आदेशाने व  मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधीक्षक  डॉ.विनोद जाधव, विधी सल्लागार ॲड.  रेणुका शेटे, तसेच पोलीस दलाचे पथक यांच्या मार्फत उमरगा चौरस्ता येथे करण्यात आलेल्या कारवाई मधील डॉक्टर, एजंट इतर साथीदारावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमरगा या न्यायालयात  फिर्याद  दाखल करण्यात  आली आहे. 

या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, मनोज निलंगेकर, वलीऊल्ला काझी, विनोद जानराव व प्रकाश औताडे, पांडुरंग सावंत, साईनाथ आशमोड, सुवर्णा गाडेकर व राणी चव्हाण व पोलीस ठाण्याचे श्री. क्षिरसागर व श्री. शिंदे आणि पथकाने मोठी  कामगिरी केलेली आहे.

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, नोडल ऑफिसर डॉ. दत्तात्रय खुणे यांच्या  मार्गदर्शनाखाली पीसीपीएनडीटी कमिटी सतत कार्यरत असते. मागील सहा महिन्यांचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण पाहिले तर उस्मानाबाद जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 871 वरून 912 पर्यंत पोहोचले आहे. आरोग्य विभाग तेवढ्यातच थांबणार नसून  लिंग गुणोत्तराचे प्रमाण आणखीन वाढण्यासाठी सतत कार्यतत्पर असणार आहे.  यासाठी समाजातील प्रत्येक सदस्याचा हातभार  महत्त्वाचा आहे.

 उपायजोजना म्हणून सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या महत्त्वाच्या भूमिका राहणार आहे. तसेच आजी आणि आजोबाची भूमिका, किशोर युवा संवाद करुन जागरूकता, नवविवाहित जोडप्यांच्या भेटीगाठी घेऊन गर्भलिंग निदान करणार नाही म्हणून शपथ घेणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, मुलगी जन्माला आल्यास ग्रामपंचायतमध्ये बाळाच्या आई वडिलांचा सत्कार करणे अशा अनेक माध्यमांतून स्त्री जन्माचे स्वागत व मुलींचे महत्व पटवून देण्यासंबंधित जनजागृती करणे, यासाठी ग्रामसभा मंचाचा उपयोग, खबरसाठी व्यापक प्रसिद्धी, आशा, अंगणवाडी, ANM, MPW इत्यादी कडून प्रामाणिक प्रयत्न, खेड्यापाड्यांमध्ये, त्याची भूमिका असल्याने ग्रामस्तरा मार्फत पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केले आहे.

तसेच अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. महिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. सदर माहिती मिळाल्यास नजीकच्या ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात संपर्क साधावा अथवा 18002334475  या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी. तसेच गावागावात खबऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. लिंग गुन्नोत्तर वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याबाबत जिहाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी  आवाहन केले आहे.

From around the web