उमरगा : अश्लील हावभाव करून शिवीगाळ , आरोपीस पाच हजार रुपये दंड 

 
Osmanabad police

उमरगा  : देविदास बब्रुवान चव्हाण, वय- 22 वर्षे, रा. बलसुर, ता. उमरगा यांनी अश्लील हावभाव करून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 509, 504, 506 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात नोंद क्र. 127 / 2010 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी, श्री. एस.आर. ठोंगे-पाटील यांनी करुन अतिरिक्त सत्र न्यायदंडाधिकारी,उमरगा यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 4 / 2013 चा निकाल काल दि. 29.11.2021 रोजी जाहिर झाला. यात देविदास चव्हाण यांना भा.दं.सं. कलम- 504, 509, 506 या कलमांच्या उल्लघनाबद्दल प्रत्येकी 5,000 ₹ दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

फरार आरोपी अटक 

उस्मानाबाद  : तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 113, 114 / 2019 या व तुळजापूर पो.ठा. गु.क्र. क्र. 410 / 2019 या घरफोडी, चोरीच्या 3 गुन्ह्यातील आरोपी- पाखऱ्या सुनील शिंदे उर्फ मनोज, रा. कार्ला, ता. तुळजापूर याचा पोलीस गेली 2 वर्षापासून शोध घेत होते. तो गावी आल्याची गोपनीय माहिती स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांना मिळतात त्यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, पोकॉ- अशोक ढगारे, बलदेव ठाकूर, सर्जे, उंबरे यांच्या पथकाने त्यास दि. 29.11.2021 रोजी राहत्या परिसरातून ताब्यात घेउन पुढील कारवाईसाठी तामलवाडी पो.ठा. च्या ताब्यात दिले.

            तर कळंब पो.ठा. गु.र.क्र. 167 / 2007 या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी- रामचंद्र शिवाजी पवार, वय 36 वर्षे, रा. कळंब हा पोलीसांना तपासकामी हवा होता. गेली 14 वर्षापासून त्याचा निश्चित ठावठिकाणा मिळुण येत नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. तो त्याच्या गावी येणार असल्याच्या गोपनीय माहितीवरुन स्था.गु.शा. च्या पोना- महेश घुगे, दिपक लाव्हरेपाटील, अमोल चव्हाण यांच्या पथकाने त्याच्या घरावर पाळत ठेउन तो दि. 29.11.2021 रोजी गावी येताच त्यास ताब्यात घेतले आहे.

From around the web