उमरग्यात दोन तोतया पोलिसांनी वृद्ध इसमाला गंडवले 

सोन्याचे लॉकेट व अंगठी हातोहात लंपास 
 
crime

उमरगा  : फिर्यादी नामे-अच्युतराव गणपतराव जगताप, वय 70 वर्षे, रा. बॅक कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे त्यांचे स्कुटीवरुन उमरगा येथील महादेव मंदीराकडे दर्शनासाठी जात असताना अनोळखी दोन व्यक्तीने  संगनमत करुन मोटार सायकलवर पाठीमागून येवून पोलीस अधिकारी असल्याचे भासवून जगताप यांना तुमची स्कुटी चेक करायची आहे. तुम्ही स्कुटी थांबवा असे म्हणून त्यांचे गळ्यातील लॉकेट हातातील अंगठी गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवण्यास सांगून जगताप यांनी ते काडुन डिक्कीमध्ये ठेवले असता नमुद अनोळखी दोन व्यक्तीनी जगताप यांचे अंदाजे 1,00,000₹ किंमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट व अंगठी असा एैवज कडून घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी अच्युतराव जगताप यांनी दि.25.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-419, 170, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
 क्रेडीट कार्डची माहिती देऊन फसवणूक 

परंडा  : फिर्यादी नामे- बुध्दीवान परमेश्वर काळे, वय 34 वर्षे, रा. टाकळी ता. परंडा जि. धाराशिव यांचे दि. 15.07.2023 रोजी 09.00 वा. सु. ते दि. 16.08.2023 रोजी 14.00 वा. सु. मोबाईल नंबर 99073344119 वरुन फिर्यादीच्या मोबाईवल फोन करुन फिर्यादीचे क्रेडीट कार्डची माहिती घेवून क्रेडीट कार्डवरुन 4,500 काडून घेवून व क्रेडीट कार्डवरुन 1,19,000 ₹ लोन उचलून बुध्दीवान काळे यांची एकुण 1,23,500₹ ची फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी बुध्दीवान काळे यांनी दि.25.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web