उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

उंडेगाव येथे एकास मारहाण 
 
Osmanabad police

लोहारा : तोरंबा, ता. लोहारा येथील भागवत रघुनाथ मुंजाळे यांच्या शेतातील 30 पोती सोयाबीन व शेजारी- पांडुरंग माधव रणखांब यांच्या शेतातील 10 पोती सोयाबीन आणि  25 कोंबड्या दि. 03- 04 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या भागवत मुंजाळे यांनी दि. 04 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : अब्दुल कुरेशी, रा. उस्मानाबाद यांच्या वडगाव येथील विटभट्टी कार्यालयातील अपोलो कंपनीचे 1000 × 20 आकाराचे एकुण 4 टायर दि. 03 ऑक्टोबर रोजी 01.30 वा. सु. भाफर, ता. चिडावा, जि. झुझूंनु, राज्य- राजस्थान येथील बबलु नायक, रिना नायक, रामेश्वर नायक, संजय नायक अशा चौघांनी ट्रक क्र. आर.जे. 18 जीए 7828 मधून चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या अब्दुल कुरेशी यांनी दि. 4 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उंडेगाव येथे मारहाण 

अंबी : उंडेगाव, ता. परंडा येथील प्रमोद शेरे, शहाजी शेरे, गणेश शेरे, प्रदीप शेरे अशा चौघांनी ट्रॅक्टर घेउन जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या कारणावरुन दि. 03 ऑक्टोबर रोजी 18.30 वा. सु. गावकरी- अक्षय करंडे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळर करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अक्षय करंडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web