उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे 

 
Osmanabad police

उमरगा  : येणेगुर, ता. उमरगा येथील मनोज शिवसेन इगवे हे दि. 05.01.2022 रोजी 14.30 ते 15.30 वा. दरम्यान जकेकुरवाडी फाटा येथील रस्त्याकडेला आपली हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएच 4492 ही लावून जवळील एका जांभळाच्या झाडाखाली झोपले होते. दरम्यानच्या काळात त्यांची नमूद मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मनोज इगवे यांनी दि. 20 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : पळसप, ता. उस्मानाबाद येथील दिपक अशोक सरडे यांच्या बंद घराचे कुलूप दि. 19.01.2022 रोजी 01.00 ते 05.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील लोखंडी पेटीतील 12 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 40,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दिपक सरडे यांनी दि. 20 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नासधूस 

परंडा : तांबेवाडी, ता. भुम येथील ग्रामस्थ- भागवत कुटे यांनी जुन्या वादातून दि. 20.01.2022 रोजी 05.30 वा. सु. शिवारातील गट क्र. 156 मधील प्रविण मुंढे यांचे ऊसाचे पिक पेटविण्याचा प्रयत्न करुन शेजारच्या पद्माकर मुंढे यांच्या शेतातील ऊसाचे पाचट पेटवले. तसेच पद्माकर यांच्या शेत विहीरीवरील विद्युत फलकातील फ्युज, स्टार्टर यांची मोडतोड केली. अशा मजकुराच्या प्रविण आबासाहेब मुंढे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

From around the web