उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे 

 
Osmanabad police

तुळजापूर  : तिर्थ (खु,) ता. तुळजापूर येथील शाम काशिनाथ पटाडे यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 2687 हि दि. 10-11.11.2021 दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शाम पटाडे यांनी दि. 18 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  : शेकापुर, ता. उस्मानाबाद येथील बाळासाहेब रंगनाथ खोत यांची मारुती कार क्र. एम.एच. 24 एएस 1893 ही दि. 17- 18.11.2021 दरम्यानच्या रात्री उस्मानाबाद- तुळजापूर रस्त्यालगतच्या प्रियदर्शनी हॉटेलजवळ लावली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाळासाहेब खोत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लैंगीक अत्याचार

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील एक 37 वर्षीय पुरुष (नाव- गाव गोपनीय) मागील तीन महिन्यांपुर्वी त्याच्या हॉटेलात एकटा असल्याची संधी गावातीलच एका परिचीत पुरुषाने साधून हॉटेल जाउन त्याच्यासोबत बळजबरीने अनैसर्गीक संभोग केला. अशा मजकुराच्या संबंधीत पुरुषाने दि. 18 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 377, 347 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web