धाराशिवमध्ये दोन तोतया पोलिसांकडून फसवणूक 

दीड  तोळ्याचे  लॉकेट पळवले 
 
crime

धाराशिव : फिर्यादी नामे- राजकुमार बाबुराव पवार, वय 69 वर्षे, रा. गणेश नगर, ता. जि. धाराशिव यांचे दि. 24.09.2023 रोजी 16.50 वा. सु. मिलींद पाटील यांचे पेट्रोल पंपाचे विरुध्द दिशेस असणाऱ्या सर्विस रोडवर धाराशिव येथे अज्ञात दोन व्यक्तीने आम्ही पोलीस असल्याची बतावणी करुन राजकुमार पवार यांचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम 16,500 ₹ असा एकुण 71,500₹ ची फसवणूक करुन घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी राजकुमार पवार यांनी दि.24.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 24.09.2023 रोजी 18.40 वा. सु. तुळजापूर पो.ठा. हद्दीत गणेश नगर तुळजापूर येथे सार्वजनिक रोडवर रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना सरडेवाडी ह.मु. गणेश नगर नळदुर्ग रोड तुळजापुर ता. तुळजापूर जि.धाराशिव येथील- किशोर तुकाराम सरडे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे लोखंडी धारदार कत्ती बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील ती लोखंडी कत्ती जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web