उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात दोन ठार, दोन जखमी

 
Osmanabad police

शिराढोण  : ढाकणी, ता. लातुर येथील रवि संभाजी सुरवसे व शिवाजी चंदर पवार हे दोघे दि. 31.10.2021रोजी 21.30 वा. सु. खामसवाडी शिवारातील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 4405 च्या धडकेत शिवाजी पवार हे मयत झाले तर रवि सुरवसे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता नमूद ट्रॅक्टर चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन पसार झाला.अशा मजकुराच्या रवि सुरवसे यांनी दि. 01.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं.कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

ढोकी :वानेवाडी, ता. उस्मानाबाद येथील विनोद भास्कर सरवदे, वय 36 वर्षे हे दि. 29.10.2021रोजी 13.30 वा. सु. मित्र मुन्ना राउत यांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसून तेर तेपळसप जात होते. यावेळी वाहन क्र. एम.एच. 12 डीएम 7738 हे अज्ञात चालकाने निष्काळजीपने चालवल्याने विनोद प्रवास करत असलेल्या मो.सा. ला. समोरुन धडकले. या अपघातात विनोद सरवदे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारा दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- प्रदिप सरवदे यांनी दि. 01.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं.कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

उमरगा  :व्हंताळ, ता. उमरगा येथील महेश जाधव, वय 32 हे दि. 25.10.2021 रोजी 15.00 वा. तुरोरी-उमरगा रस्त्यावरील मातोश्री हॉटेजवळ पायी रस्ता ओलांडत होते. यावेळी अज्ञात चालकाने निष्काळजीपने कार चालवल्याने ती कार महेश यांना धडकली. या अपघातात महेश यांच्या उजव्या हातास गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या महेश जाधव यांनी दि. 01.11.2021रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134,184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

From around the web