उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, एक जखमी 

 
Osmanabad police

कळंब : एक अंदाजे 55 वर्षीय पुरुष दि. 20.10.2021 रोजी 21.00 वा. सु. कळंब येथील येरमाळा रस्त्याने पायी जात असतांना अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने अंबाजोगाई येथील हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान दि. 21.10.2021 रोजी 08.00 वा. सु. मयत झाला. या अपघातानंतर जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अज्ञात मो.सा. चा अज्ञात चालक वाहनासह अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या कळंब पो.ठा. चे पोलीस नाईक- मनोहर दळवे यांनी अनैसर्गीक मृत्युच्या चौकशी दरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : चालक- जयवंतसिंग चंदनसिंग मुल्ले, रा. गुजरात यांनी दि. 30.11.2021 रोजी रात्री 03.00 वा. सु. बोरी गावातील एका ढाब्यासमोरील रस्त्यावर ट्रक क्र. जी.जे. 10 झेड 6665 हा पार्कींग दिवा न लावता निष्काळजीपने उभा केला होता. यावेळी दिनेशकुमार भरत वर्मा, वय 28 वर्षे, रा. तेजकड, जि. प्रतापगड, रा. उत्तरप्रदेश हे चालवत असलेला ट्रक क्र. एच.आर. 55 व्ही 7410 हा त्या ट्रकला पाठीमागून जाउन धडकला. या अपघातात दिनेशकुमार हे मयत झाले तर त्यांचा ट्रक सहायक- अनिल बरसाती रा. उत्तरप्रदेश हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या राजेश राजनिवास शर्मा, रा. पुणे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी 

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील समशेअलाम खाजामैनोद्दीन सय्यद यांच्या भावाच्या नावे असलेल्या कुमाळवाडी येथील शेतातील 2 कुपनलीकेतील 2 व 1.5 अश्वशक्ती क्षमतेचे क्रॉम्पटन ग्रीव्हजचे 2 विद्युत पंप व 1,300 फुट वायर दि. 21- 23.11.2021 दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या समशेअलाम सय्यद यांनी दि. 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web