लोहारा तालुक्यात दोन अपघातात दोन ठार , एक जखमी
लोहारा : चालक- प्रशांत संगशेट्टी, रा. लोहारा यांनी दि. 15.09.32021 रोजी 12.30 वा. सु. विलासपुर (पां.) – वडगाव (गा.) रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 1773 ही निष्काळजीपने चालवल्याने विनाक्रमांकाच्या बुलेट मोटारसायकलला समोरुन धडकली. या अपघातात बुलेट चालक- योगेश नामदेव क्षिरसागर, रा. वडगाव हे गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले महेश बब्रुवान बिराजदार, वय 22 वर्षे, रा. विलासपुर (पां) हे मयत झाले. अशा मजकुराच्या योगेश क्षिरसागर यांनी दि. 26.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत लोहारा तालुक्यातील हिप्परगा (स.) येथील शोकतअली ईस्माईल कारभारी, वय 24 वर्षे हे दि. 21.01.2022 रोजी 18.42 वा. सु. जेवळी (उ) – धानुरी रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीआर 1198 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 3012 ही निष्काळजीपने चालवल्याने कारभारी यांच्या नमूद मो.सा. ला समोरुन धडकली. या अपघातात शोकतअली हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- इस्माईल कारभारी यांनी दि. 26 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.