उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात दोन ठार, एक जखमी 

 
Osmanabad police

मुरुम  : चालक- धनंजय सुदाम शिंदे, रा. अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 11.01.2022 रोजी 19.30 वा. सु. येणेगूर शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर कार क्र. एम.एच. 04 ईक्यु 1261 ही निष्काळजीपने चालवल्याने आष्टाकासार, ता. लोहारा ग्रामस्थ- बाळासाहेब प्रेमनाथ पवार, वय 33 वर्षे हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 8870 ला पाठीमागून धडकली. या अपघातात बाळासाहेब पवार हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- अरुणा पवार यांनी दि. 23.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : दहिफळ, ता. वाशी येथील ग्रामस्थ- शिवाजी विठ्ठल सातपुते, वय 50 वर्षे हे दि. 31.12.2021 रोजी 17.00 वा. सु. रुई फाटा येथील रस्त्याने जात होते. यावेळी अज्ञात चालकाने स्कॉर्पीओ वाहन क्र. एम.एच. 25 एएल 6577 हे निष्काळजीपने चालवल्याने शिवाजी सातपुते यांना पाठीमागून धडकले. या अपघातात शिवाजी सातपुते हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद स्कॉर्पीओचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा चुलत भाऊ- लिंबाजी लक्ष्मण सातपुते, रा. दहिफळ यांनी दि. 23.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : चालक- नागेश व्यंकट भोसले, रा. कर्नाटक राज्य यांनी दि. 20.01.2022 रोजी 23.00 वा. सु. तुरोरी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर ट्रक क्र. के.ए. 56-4230 हा निष्काळजीपने चालवल्याने तो अनियंत्रीत होउन रस्त्याबाजूच्या खड्ड्यात गेला. यात ट्रकच्या हौद्यातील सळया ट्रकच्या केबिनमध्ये घुसल्याने चालक- नागेश भासले यांसह ट्रक सहायक- नागेश देवेंद्र अप्पा इस्बी, रा. नागाददलाही, ता. चिंचोली, जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या नागेश इस्बी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web