उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात दोन ठार, एक जखमी 

 
Osmanabad police

तामलवाडी  : चालक- लजीतराम दिलुराम, रा. पटियाला, राज्य- पंजाब यांनी दि. 04.12.2021 रोजी 21.20 वा. सु. नांदुरी शिवारातील रस्त्यावर हार्वेस्टर वाहन क्र. पी.बी. 11 सीक्यु 2105 हे निष्काळजीपने चालवून अचानक ब्रेक लावल्याने हार्वेस्टरच्या मागील ट्रॉलीचा धक्का पाठीमागील मोटारसायकलला लागला. या अपघातात मो.सा.चालक- प्रल्हाद किसन चव्हाण, वय 42 वर्षे, रा. होटलवाडी, ता. लोहा, जि. नांदेड हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या ज्योतीराम किसन चव्हाण, रा. लोहा यांनी दि. 05 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : वेताळनगर, तुळजापूर येथील पवन राजेंद्र भोसले, वय 20 वर्षे हे दि. 05.12.2021 रोजी 05.00 वा. सु. सिंदफळ शिवारातील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मो.सा. क्र. एम.एच. 25 एयु 7461 ही निष्काजीपने चालवल्याने पवन भोसले यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या नेताजी दगडूबा गव्हाणे, रा. तुळजापूर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : कराळी तांडा, ता. उमरगा येथील शरद धुन चव्हाण व पुजा हे दोघे पती- पत्नी दि. 01.12.2021 रोजी 01.00 वा. सु. कराळी फाटा येथील रस्ता पायी ओलांडत असतांना रोहिदास राठोड यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 7366 ही निष्काळजीपने चालवून नमूद चव्हाण पती- पत्नीस धडक दिली. या अपघातात शदर चव्हाण यांच्या डाब्या गुडघ्याचे हाड मोडुन ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या शरद चव्हाण यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

तुळजापूर  : सुनिल मेसा चंदनशिवे, रा. वडगाव (ला.) व नागेश नारायण चव्हाण, रा. तुळजापूर यांनी दि. 05.12.2021 रोजी 10.30 व 11.30 वा. सु. तुळजापूर येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 एएल 2574 व एम.एच. 13 बीएन 0310 हे रहदारीस धोकादायपने उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web