उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
Osmanabad police

उमरगा  : दाळींब येथील चालक ईस्माईल शेख हे दिनांक 28.12.2021 रोजी मुळज येथिल महामार्गावरुन रिक्शातुन प्रवासी घेवुन जात होते. यावेळी चालक महमंद खिजर रा.बसवकल्याण यांनी पिकअप वाहन क्रमांक के ए 56 5020 हा निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवल्याने पिकअप शेख यांचे रिक्शाला समोरुन धडकला. या अपघातात रिक्शा मधील तुरोरी ग्रामस्थ श्रीमती उशा साळुंखे वय 45 वर्ष या गंभीर जखमी होवुन मयत झाल्या. अशा मजकुराच्या  ईस्माईल शेख दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा दि. 01 जानेवारी रोजी नोंदवला आहे.

 
बेंबळी   : पाडोळी ग्रामस्थ बालाजी बोचरे  वय 48 वर्ष हे  दिनांक 06.12.2021 रोजी गावातील उस्मानाबाद - औसा रस्त्यावरुन पायी जात होते. यावेळी ग्रामस्थ दत्ता बबन गुंड याने मोटार सायकल क्रमांक एम एच 25 ए पी  1685 ही निष्काळजीपणे चालवल्याने मोटर सायकल दत्ता गुंड यांना पाठीमागुन धडकली. या अपघातात दत्ता गुंड हे गंभीर जखमी होवुन मयत झाले.अशा मजकुराच्या भाउ- अच्युत बोचरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मदयधुंद वाहन चालकांवर कारवाई

दिनांक 31.12.2021 ते 01.12.2022 दरम्यानच्या रात्री आनंदनगर पोलीसांनी 3 मदयधुंद वाहन चालकांवर कारवाई केली. यात दिलीप रणखांब,रा.उस्मानाबाद, रविकांत लोखंडे, रा.पंढरपुर, अनंत गाडवे रा.येडशी  हे तीघे उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय ईमारती समोरील रस्त्यावर मदयधुंद अवस्थेत मोटार सायकल चालवताना आढळले.यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादवी  कलम 184,185 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web