उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
Osmanabad police

नळदुर्ग  : गोंधळवाडी, ता. तुळजापूर येथील प्रविण नागनाथ मोटे व पांडुरंग गुलाब पाटील, वय 26 वर्षे हे दोघे दि. 18.11.2021 रोजी 14.45 वा. सु. जळकोट- गोंधळवाडी असा वेगवेगळ्या मोटारसायकलने प्रवस करत होते. दरम्यान नळदुर्ग घाटातील रस्त्यावर अज्ञात चालकाने ट्रक क्र. जी.जे. 37 टी 0716 ही चुकीच्या दिशेने, निष्काळजीपने चालवून पांडुरंग पाटील चालवत  असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडक दिल्याने पाटील हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या प्रविण मोटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 427 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : खासगाव, ता. परंडा ग्रामस्थ- शहाबाई बंडू शिंदे, वय 60 वर्षे, या दि. 15.11.2021 रोजी पहाटे 05.46 वा. सु. गावातील देवगाव रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी चालक- सुशांत कल्याण शिंदे, रा. करकंब, ता. पंढरपुर यांनी मिनी ट्रक क्र. एम.एच. 13 आर 4702 हा निष्काळजीपने पाठीमागे चालवल्याने शहाबाई शिंदे यांना धडकला. या अपघातात शहाबाई या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- नागेश शिंदे यांनी दि. 18 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कायद्याच्या मर्यादेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगण्याचे उस्मानाबाद पोलीसांचे आवाहन

उस्मानाबाद  : नोव्हेंबर 2021 महिन्यात देशभरात त्रिपुरा राज्यात तसेच महाराष्टातील अमरावती, मालेगाव या गावांत समाजातील दोन वर्गात तेढ निर्माण करणाऱ्या अनुचित घटना घडल्या आहेत. हल्ली सामाजिक माध्यमांचा वापर अगदी खेडेगावापर्यंत होत असून या घटनां संबंधी सामाजिक माध्यमांमध्ये वेगवेगळ्या अंगाने प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. सायबर पोलीस ठाण्यामार्फत अशा सामाजिक प्रसार माध्यमांचे पोलीस नियमीत अवलोकन करत आहेत.अशा प्रतिक्रीयांपैकी काही अनुचित प्रतिक्रीयांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होउन सामाजिक शांतता धोक्यात येउ शकते. परिणामी अशा घटनांवर प्रतिक्रीया देताना कायद्याच्या कक्षेंतर्गत आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करुन आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगावे. असे आवाहन उस्मानाबाद पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक श्रीमती- नीवा जैन यांनी जनतेस केले आहे.

From around the web