उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
Osmanabad police

लोहारा  : चालक- अमोल देवकर, रा. मार्डी यांनी दि. 20.09.2021 रोजी 08.00 वा. सु. डॉ. आंबेडकर चौक, लोहारा येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 2067 ही निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवून रस्त्याकडेन पायी जाणाऱ्या मनोहर कोंडीबा बिराजदार, वय 60 वर्षे, रा. लोहारा यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात बिराजदार हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अपघातानंतर नमूद मो.सा. चालक जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताच्या पत्नी- मैनाबाई बिराजदार यांनी दि. 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : किरण धोंडीबा शित्रे, वय 24 वर्षे, रा. बिजनवाडी, ता. तुळजापूर हे त्यांचे भावजी- हनुमान गवळी यांच्यासोबत दि. 04 ऑक्टोबर रोजी 18.30 वा. सु. तुळजापूर- नळदुर्ग असा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 7881 ने प्रवास करत होते. तीर्थ (खु.) पाटी येथे आले असता अचानक पाऊस सुरु झाल्याने मो.सा. रस्त्याकडेला उभाकरुन हनुमान गवळी जवळील झाडाखाली गेले तर किरण हे मो.सा. जवळ थांबले. यावेळी चालक- दत्ता तानाजी बनसोडे, रा. तीर्थ (खु.) यांनी ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 6066 हा निष्काळजीपने चालवून किरणसह मो.सा. पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. तसेच या अपघातात मो.सा. चे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- धोंडीबा शित्रे यांनी दि. 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ), 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web